महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध ठिकाणी विनम्र अभिवादन ..

 महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध ठिकाणी विनम्र अभिवादन ..


औसा प्रतिनिधी 

औसा:तालुक्यातील भादा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध ठिकाणी विनम्र अभिवादन करण्यात आले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची घटना लिहिण्याचे महत्त्वाचे कार्य केले असून बहुजनांना गेल्या पाच हजार वर्षापासून मोठ्या समस्यांचा आणि सामाजिक दबावाचा प्रभाव त्या बहुजन समाजावर होता तो प्रभाव कमी करण्याचे काम आणि माणसाला माणुसकीने जगण्याचा अधिकार देण्याचा कायदा करणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाली आहे.

यामुळे देशातील सर्व बौद्ध बांधव आणि बहुजन समाज या महामानवास विविध ठिकाणी विनम्र अभिवादन करतात याकरिता भादा येथे ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद शाळा, पोलीस ठाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, वीज वितरण कंपनी कार्यालय अशा विविध ठिकाणी विनम्र अभिवादन करण्यात आले.

ग्रामपंचायत कार्यालय भादा येथे ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत उबाळे,अमोल पाटील, पत्रकार बाबुराव आगलावे, बी डी उबाळे व इतर भादेकर मित्र मंडळ आणि ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या