श्री मुक्तेश्वर देवालय न्यास च्या वतीने उद्यापासून कीर्तन महोत्सव प्रारंभ..


 श्री मुक्तेश्वर देवालय न्यास च्या वतीने उद्यापासून कीर्तन महोत्सव प्रारंभ.. 

औसा प्रतिनिधी 

औसा शहराचे ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर देवालय न्यास च्या कलशारोहण सोहळ्याच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 3 डिसेंबर पासून 10 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये भव्य महिला किर्तन महोत्सवाचे आयोजन श्री मुक्तेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मैदान औसा येथे करण्यात आले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे मुक्तेश्वर मंदिर कलशारोहण सोहळ्याच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 3 डिसेंबर पासून दररोज सायंकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये ह.भ.प. शिवलीला पाटील बार्शी, गीतांजली झेंडे अहिल्यानगर, रूक्‍मीनबाई हावरे जालना, कीर्तीताई स्वामी लातूर, ज्ञानेश्वरी बागुल नाशिक, महादेवी मठपती अक्कलकोट आणि  भाग्यश्री पाटील हिप्परगा यांचे कीर्तन होणार असून दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता ह.भ.प. गोविंदराव तिडके महाराज समदर्गा यांच्या काल्याच्या कीर्तनाने महिला किर्तन महोत्सवाची सांगता होणार आहे तरी मंदिर समितीच्या वतीने आयोजित कीर्तन महोत्सवातील आध्यात्मिक पर्वणीचा आनंद घेण्यासाठी तसेच महाप्रसादासाठी भाविक भक्तांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मुक्तेश्वर देवालय न्यास चे अध्यक्ष ऍड. मुक्तेश्वर वागदरे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या