*वन्यजीव प्रेमीच्या सतर्कतेमुळे धामीन जातीच्या सापाला जीवदान*
औसा:-
तपसे चिंचोली गावातील वन्यजीव प्रेमी प्रशांत नेटके यांनी शेतातील शेडमध्ये आडोश्याला बसलेल्या धामीन जातीच्या सापाला सर्पमित्र संजय कांबळे यांच्या मदतीने जीवदान देण्यासाठी प्रयत्न केले . तपसे चिंचोली गावापासून जवळच्या गोटेवाडी रस्त्यालगत असलेल्या नेटके यांच्या शेतात सांयकाळच्या वेळी शेड मध्ये साप निदर्शनास आला. त्वरित वनविभागाचे कर्मचारी राहुल शिंदे भ्रमणध्वनीद्वारे कळवण्यात आले. याच दरम्यान, साप तिथे असणाऱ्या आडोश्याला असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याची त्यातून बाहेर पडण्याची धडपड सुरू होती. वनकर्मचारी राहुल शिंदे यांनी सर्पमित्र संजू कांबळे यांना घटनास्थळी बोलावून आडोश्याला बसलेल्या धामण जातीच्या सापाला सर्पमित्राच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर वनक्षेत्रात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती सर्पमित्र संजू कांबळे यांनी दिली.
0 टिप्पण्या