तीन मजली शॉपिंग सेंटरच्या तळघरात पाणीच पाणी व्यापारी त्रस्त..

 तीन मजली शॉपिंग सेंटरच्या तळघरात पाणीच पाणी व्यापारी त्रस्त..


 औसा प्रतिनिधी 

औसा नगर परिषदेच्या वतीने अत्यंत चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेले  जूने बस स्थानकाच्या उत्तरेकडील बाजूच्या तीन मजली शॉपिंग सेंटरच्या तळमजल्यात पाणीच पाणी साचल्यामुळे या तळघराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. संपूर्ण तळमजला तुडुंब भरून फुठल्याने येथील पाणी मुक्तेश्वर रोडवरून रस्त्यावरून ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे. जुन्या बस स्थानकाच्या समोरील तीन मजली शॉपिंग सेंटरचे बांधकाम अत्यंत चुकीच्या पद्धतीने करण्यात आले असून तळमजला हा वाहन पार्किंगसाठी म्हणून बांधण्यात आला आहे परंतु येथे कसलेही प्रकारची पार्किंग करणे शक्य नाही या तळमजल्यामध्ये आठ ते दहा फूट पाणी साचले असून या पाण्याला आउटलेट नसल्यामुळे घाण पाणी साचल्यामुळे या ठिकाणी डासांचे प्रमाण वाढले असून या परिसरातील व्यापारी त्रस्त झाले आहेत. मुख्यमंत्र्याच्या शंभर दिवसाच्या प्रति आराखडा कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ औसा आणि सुंदर औसा या उपक्रमाच्या माध्यमातून तहसील कार्यालय, नगर परिषद आणि पोलीस खात्याच्या अधिकारी कर्मचारी यांच्यासह पत्रकार व सामाजिक सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली होती. स्वच्छता करूनही या परिसरात घान साचल्यामुळे व्यापारी शॉपिंग सेंटरच्या तळमजल्यामध्ये साचलेल्या पाण्यामुळे व्यापारी व नागरिक वैतागले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या