आलमला येथील फार्मसी कॉलेजच्या वतीने
एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन..
औसा प्रतिनिधी
औसा:दि. 01 डिसेंबर 2024 हा जागतिक एडस दिनानिमित्त औसा येथे शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी व दगडोजीराव देशमुख कॉलेज ऑफ फार्मसी आलमलाच्या वतीने पोलीस स्टेशनं ते ग्रामीण रुग्णालय औसा पर्येंत, एडस जनजागृती रॅली काढण्यात आली.
प्रमुख पाहुणे म्हणून
डॉ. आर एस. देवणीकर ता वैद्यकीय अधिकारी औसा,डॉ.सुनीता पाटील मॅडम M.S RH औसा. फार्मसी कॉलेज चे प्रचार्य विश्वेशोर धाराशिवे हजर होते. डॉ. देवणीकर यांनी HIV एडस विषयी खूप छान सखोल माहिती दिली. यावेळी समाजामध्ये व सर्व जाणारी अंधश्रद्धा ही दूर करण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले आणि नागरिकांना असलेल्या विविध समस्या आणि संभ्रमाविषयी माहिती देऊन जनजागृती रॅलीचे
तसेंच डॉ. सुनीता पाटील यांनी पण HIV एडस या विषयावर अमूल्य मार्गदर्शन केले आणि उपस्थित विद्यार्थी नागरिक आणि कर्मचारी यांना माहिती दिली यावेळी रुग्णालयाचा स्टाफ आणि कॉलेजमधील कर्मचारी वर्ग डी फार्मसी, बी फार्मसी कॉलेज मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी वर्ग आणि संबंधित आरोग्य खात्याच्या कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित सदरील जनजागृती ही चांगल्या पद्धतीने यशस्वी संपन्न झाली अशी माहिती आरोग्य विभागाच्या आलमला येथील कर्मचारी आरोग्य सेविका प्रमिला शिंदे यांनी सदरील राष्ट्रीय कार्यक्रम एड्स जनजागृती रॅली बाबत सदरील प्रतिनिधीशी माहिती दिली.
0 टिप्पण्या