भादा येथे लोकसहभागातून बनवीला वनराई बंधारा; पाणी पातळी वाढण्यास मदत होणार
औसा प्रतिनिधी
औसा: भादा तालुका औसा या ठिकाणी ग्राम पंचायत कार्यालय आणि महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने श्रमदानातून नाल्याच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहावर तलाव क्रमांक एक आणि गावची पाणीपुरवठा सिंचन विहिरीच्या समीप हा 10 ते 15 मिटर लांबीचा वनराई बंधारा गुरुवार दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी श्रमदानातून बांधण्यात आला.
या माध्यमातून पाणी आडवा पाणी जिरवा अभियानाची जागृती शेतकरी वर्गामध्ये कृषि सहाय्यक सुरेखा गव्हाणे मॅडम यांच्याकडून करण्यात आली. या बंधाऱ्यामुळे भूजल पातळीमध्ये वाढ नक्कीच होणार आहे.तसेच या बंधाऱ्यामुळे रब्बी हंगामातील हरभरा,ज्वारी, पिकाकरिता संरक्षित पाणी देण्यास मदत होते. या बंधाऱ्या बांधण्याच्या प्रक्रियेमध्ये सिमेंटची, साखरेची,पशुखाद्यचे, खताचे मोकळी पोती घेऊन त्यामध्ये वाळू आणि काळी माती भरून ती पोती शिवली आणि बांधली जातात आणि नाल्याच्या अरुंद भागामध्ये आडवा पोत्याचा थर टाकला जातो मधल्या बाजूने काळी माती लावून घेतली जाते व वनराई बंधारा तयार केला जातो.
वरील कार्यक्रमांमध्ये कृषी सहाय्यक सुरेखा गव्हाणे, ग्राम पंचायत अधिकारी एम व्हि सुर्यवंशी,उपसरपंच बी एम शिंदे, ग्राम रोजगार सहाय्यक बी.डी. उबाळे,ग्राम पंचायत लिपिक लखन लटूरे, भमू स्वामी,शोयब अक्तर,अल्ताफ पठाण,भैरव मोरे तसेच भादा गावातील शेतकरी,नागरीक उपस्थित होते.
0 टिप्पण्या