जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनंदनगर भादा येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात..
औसा प्रतिनिधी
औसा: तालुक्यातील भादा जिल्हा परिषद आनंदनगर शाळेमध्ये शालेय समिती आणि शाळाच्या वतीने माजी विद्यार्थी स्नेह मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील गिरी, तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन प्राध्यापक सतीश पवार,संचालक विद्या आराधना अकॅडमी लातूर,बालाजी मनोहर शिंदे, उपसरपंच भादा,रविशंकर रमाकांत पाटील, महाराष्ट्र पोलीस मुंबई,महेश ईश्वर गायकवाड, व्हाईस चेअरमन भादा, भेटा केंद्राचे केंद्रीय मुअ.
मुजावर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रेवण गायकवाड,भा भूमिपुत्र प्रा डॉ. नागनाथ फरताळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी शाळेत माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक डॉक्टर नागनाथ फरताळे यांनी शाळेस सुसज्ज प्रयोगशाळा निर्मितीसाठी साहित्य भेट दिले.रविशंकर पाटील यांनी शाळेतील चार विद्यार्थिनींना दत्तक घेऊन त्यांना सर्व शैक्षणिक साहित्य दिले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चव्हाण आय.एच. यांनी केले तर सूत्रसंचालन जाधव श्रीहरी बी यांनी केले. व आभार महेश कांबळे यांनी मांडले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चव्हाण मॅडम,बाडगिरे श्रीमती बादाडे,श्रीमती ठाकूर,श्रीमती विभूते,श्रीमती राठोड व माळी सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
0 टिप्पण्या