शंभर टक्के विद्यार्थी गणवेशात ठेवणारी फत्तेपूर ची आदर्श शाळा..

 शंभर टक्के विद्यार्थी गणवेशात ठेवणारी फत्तेपूर ची आदर्श शाळा..



औसा प्रतिनिधी 

औसा तालुक्यातील फत्तेपुर येथील लक्ष्मीबाई ढेरे विद्यालय ही शाळा औसा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये विविध उपक्रमाने नावलौकिक कमवत आहे या शाळेतील शंभर टक्के विद्यार्थी गणवेश धारण करूनच शाळेत येतात या शाळेसाठी फत्तेपुर करजगाव जावतपुर वाघोली चलबुर्गा इतका तांबरवाडी केंगलवाडी इत्यादी गावातून शेकडो विद्यार्थी अत्यंत शिस्तीमध्ये शाळेत येतात प्रार्थना झाल्यानंतर विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सहभागाने नित्य परिपाठ घेतला जातो शिक्षणासोबतच कला क्रीडा व सांस्कृतिक विभागांमध्ये ही या शाळेच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे संस्थेचे अध्यक्ष ॲड बाबुराव मोरे सचिव प्रा दत्तात्रेय सुरवसे कोषाध्यक्ष दयानंद चव्हाण आणि संचालक मंडळ यांच्यासह मुख्याध्यापक मुळे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याने या शाळेचा नावलौकिक होत वाढत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या