बांगलादेशातील हिंदूच्या रक्षणासाठी मानवाधिकार दिनी औसा येथे आंदोलन..
औसा प्रतिनिधी
10 डिसेंबर हा जागतिक मानवाधिकार दिन म्हणून पाळला जातो बांगला देशांमधील हिंदू समाजाची 17% वरून लोकसंख्या अवघे सात टक्क्यापर्यंत घटली असून बांगलादेशात असलेल्या हिंदू जनतेवर अमानुष अत्याचार होत आहेत तसेच तेथील महिलांचे आणि लहान बालकांचे जगणे कठीण झाले आहे हिंदू देवतांच्या मंदिरांची नासधुस करून हिंदू समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात मानव अधिकार दिनाचे औचित्य साधून औसा येथे सकल हिंदू समाज संघटनेच्या वतीने वीर हनुमान मंदिर चौक औसा येथे विश्व हिंदू परिषद व इतर हिंदू संघटनांचा वतीने सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत काळ्याफिती लावून हिंदू वरील होत असलेले अत्याचार थांबविण्यासाठी आंदोलन करण्यात आले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वीर हनुमान मंदिर चौक येथून सकल हिंदू बांधवांनी बांगलादेशातील हिंदू बांधवांना न्याय मिळावा म्हणून न्याय यात्रा तहसील कार्यालयापर्यंत काढून तहसीलदार घनश्याम अडसूळ यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर केले या आंदोलनात विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या