औसा शहराच्या वाढीव वस्तीच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामास गती..

 औसा शहराच्या वाढीव वस्तीच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामास गती..


औसा प्रतिनिधी 

औसा शहराची वाढती लोकसंख्या आणि शहरात होत असलेली पाणीपुरवठ्याची गैरसोय लक्षात घेऊन शहराचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावर असताना 2019 मध्ये शहराच्या मागणी धरणातील पाणीपुरवठा योजनेसाठी 45 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला होता औसा ते मागणी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यानंतर शहराचा वाढता विस्तार आणि शहराच्या विस्तारित भागातील नागरिकांची पाण्याची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्याने मंजूर झाला आहे हा निधी मंजूर झाल्यानंतर शहराच्या विस्तारित वस्तीमध्ये पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे औसा शहराच्या नवीन विस्तारित वस्तीमध्ये सुरू होत असलेले पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचे काम जलद गतीने करून शहराच्या नवीन भागात राहत असलेल्या नागरिकांची पाण्याची गैरसोय लवकरच दूर होण्यास या कामामुळे मदत होणार असून वाढीव व विस्तारित नवीन वस्तीमध्ये पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचे काम सुरू असल्याने नागरिकांमध्ये समाधान दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या