आ. अभिमन्यू पवार यांच्या विजयासाठी शिवसेनेने शर्थीने खिंड लढविली..
औसा प्रतिनिधी
औसा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार अभिमन्यू पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून शिवसेनेने जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली खांद्याला खांदा लावून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला शिवाजीराव माने आणि तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे यांनी यापूर्वीच शेकडो गावांमध्ये सर्व रोग निदान आरोग्य शिबिराच्या माध्यमातून संपर्क वाढवून गावागावात शिवसैनिकांची फळी निर्माण केली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य जनतेच्या लोककल्याणकारी राबविलेल्या योजना जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य शिवसेनेच्या माध्यमातून विनोद आर्य, शहर प्रमुख बंडू कोद्रे यांनीही तितक्याच जोमाने केले होते. औसा मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी गावागावात कोट्यावधी रुपयाचा निधी देऊन मतदारसंघाचा सर्वच क्षेत्राच्या माध्यमातून विकासामुळे कायापालट करीत केलेले कार्य प्रत्येक गावातील जाहीर प्रचार सभेतून ऍड शिवाजीराव माने आणि तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे यांनी अत्यंत प्रामाणिकपणे केले भारतीय जनता पार्टीच्या गटबाजीमुळे अंतर्गत विरोधाशी आमदार अभिमन्यू पवार आणि शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना झुंज द्यावी लागली मतदार संघात केलेल्या विकास कामावरच ही निवडणूक होताना शेतकऱ्यांना गोगलगायीचे अनुदान सोयाबीन दराच्या फरकाची रक्कम म्हणून हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या वीज बिलाची माफी कर्जमाफीचे आश्वासन महिला भगिनींसाठी लाडके बहीण योजना आणि वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर मतदारांच्या गळी उत्तरविण्याचे कार्य शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी हिरीरीने केले प्रतिस्पर्धी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार दिनकर माने यांनी केलेल्या टीकेस जशास तसे सडेतोड उत्तर देत दिनकर माने यांचे निष्क्रियता आणि मागील पंधरा वर्षापासून जनतेशी तोडलेली नाळ बेलकुंड आणि किल्लारी साखर कारखान्यामुळे दिनकर माने यांच्या काळात झालेली शेतकऱ्यांच्या उसाची हेळसांड नागपूर रत्नागिरी महामार्गावर औसा ते लातूर होत असलेल्या रस्त्याचे बंद पडलेले काम इत्यादी अनेक बाबी जनतेच्या निदर्शनास आणून देत इतर माने यांचा ना करते पण शिवसेना नेत्यांनी दाखवून दिला मागील पाच वर्षातील अभिमन्यू पवार यांच्या मुळे मतदार संघात विकासाचा वाढलेला आलेख आणि मतदार संघातील शिवसेनेकांनी एक दिल्याने दिलेली साथ यामुळे आमदार अभिमन्यू पवार विक्रमी मताधिक्य मिळविण्यात यशस्वी झाले जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे विनोद आर्य, शहर प्रमुख बंडू कोद्रे यांच्यासारखे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निष्ठा ठेवून औसा मतदारसंघात शिवसेनेचे प्रामाणिकपणाने काम करणारे शिवसैनिक दिनकरराव माने यांना गमवावी लागली आणि याच कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या विजयासाठी शर्तीने खिंड लढवून घवघवीत यश संपादन केले.
0 टिप्पण्या