भारतीय
संविधान एक आदर्श जीवनशैली जगण्याचा राजमार्ग
संविधान दिन विशेष
औसा: भारतीय संविधान हे एक आदर्श जीवनशैली जगण्याचा राजमार्ग असून येथे एक सर्वसामान्य नागरिक ते देशाचे सर्वोच्च पदी असणारे राष्ट्रपती यांना भारतामध्ये सार्वजनिक ठिकाणी दैनंदिन जीवन शैली जगत असताना कोणत्या पदाचा अधिकार वापरून मनमानी करता येत नाही तर देशातील एक जवाबदार नागरीक म्हणून सर्वच भारतीयांना समान अधिकार देण्याचा कायदा आणि नियम इथे संविधानामुळे लागू करण्यात आलेला आहे.
भारतात दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हा दिवस भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
काहीं विशेष प्रवर्गाकडून पाच हजार वर्षे पीडित मानव जातीला पशु पेक्षाही हीन वागणूक दिली जात होती अशा बंधनातून या पिडीत मानवाना सोडवुन एक आदर्श मानवासारखी जीवन शैली बहाल करणाऱ्या (वागणूक) या संविधानाच्या माध्यमातून केले आहे.हे संविधान लिहिण्याचे काम करीत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रकृती स्वास्थ्य ठीक नसतानाही दलीत, शोषित, पिडीत, आदिवासी,ओबीसी (शूद्र, अतिशूद्र)मानवजातीच्या कल्याणासाठी आणि मानव मुक्तीच्या अधिकारासाठी भारताचे संविधान हा महान ग्रंथ अथक परिश्रमातून तयार करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवसांचा कालावधी लागला होता. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य हेतू हा आहे की, पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात आपल्या देशातील तरूणांमध्ये संविधानाची मूल्ये आणि तत्वे रूजवणे. आपल्या भारतीय संविधानाने देशातील शिपाई ते राष्ट्रपती अशा प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. तो कोणीही नाकारू शकत नाही.
आज आपण हा भारतीय संविधान दिन का साजरा केला जातो? आणि त्याचे महत्व काय? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
संविधान दिन का साजरा केला जातो ?
२६ नोव्हेंबर १९४९ मध्ये भारतीय संविधान सभेने भारताची राज्यघटना स्विकारली. त्यामुळे, २६ नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.
परंतु, संविधान सभेने ही राज्यघटना स्विकारल्यानंतर देशात त्याची अमंलबजावणी होण्यास काही महिने लागले. २६ जानेवारी १९५० रोजी ही राज्यघटना पूर्णपणे लागू करण्यात आली. त्यामुळे, हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
संविधान दिवस साजरा करण्याची परंपरा खरं तर २०१५ पासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे, खरं तर तेव्हापासूनच हा दिवस आपल्या भारतात दरवर्षी संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
संविधान दिनाचे महत्व काय ?
भारतीय राज्यघटनेत सर्वसामान्य नागरीक प्रमुख आधास्तंभ पकडून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधनामद्ये अनेक महत्वपूर्ण तत्त्वे समाविष्ट केले आहेत, ज्यांच्या आधारे देशातील सरकार आणि नागरिकांसाठी मूलभूत, राजकीय तत्त्वे, कार्यपद्धती, अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, कायदे इत्यादी ठरवण्यात आले आहेत.
आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये प पू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणूनही हा भारतीय संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो.
हे भारतीय संविधान अचूक पद्धतीने आणि विविध सामाजिक आर्थिक राजनैतिक बाबींचा विचार करून तसेच विविध देशातील राज्यघटनांचा अभ्यास करून हे संविधान अभ्यासपूर्ण तयार करण्यात आले आहे. हे संविधान तयार करण्यासाठी नियुक्त केलेल्या सर्व समितीने विविध कारणे देऊन संविधान निर्मिती काम करण्यासाठी ते गैरहजर राहिले परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जन्मत:च सुरू झालेले विषमतेचे चटके, सामाजिक विषमता, मानवातील भेद हे त्यांना समूळ नष्ट करुन अखिल मानव जातीवरील हा जन्मताच नशिबी आलेला शाप होता तो शाप दूर करण्याकरिता त्यांनी हे घेतलेले संविधान निर्मितीचे काम कोणत्याही कारणाने थांबता कामा नये म्हणून त्यांनी जगातील सर्व राजघटनांचा अभ्यास करून हे भारतीय संविधान सर्वोत्कृष्ट निर्माण केले आणि जगातील सर्वात महान राज्यघटना निर्मितीचा मान त्यांना सत्तर वर्षानंतरही आज मिळतोय! आज 26 नोव्हेंबर 2024 संविधान दिनानिमित्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना,बुद्धिमत्तेला,विद्वत्तेला त्रिवार वंदन .. संविधान दिन चिरायू होवो.....जय भीम...! जय भारत....!!
... बी डी उबाळे, भादा ता औसा...
0 टिप्पण्या