भादा येथे विविध ठिकाणी संविधान दिन साजरा
औसा प्रतिनिधी
औसा:भादा तालुका औसा येथे संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत कार्यालय भादा येथे संविधान दिनाच्या संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक रित्या संविधान प्रस्तविक प्रतीचे वाचन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी सूर्यवंशी उपसरपंच शिंदे व ग्रामपंचायत सदस्य नागरिक उपस्थित होते.
तसेच वनस्टॉप अंगणवाडी केंद्र भादा येथे संविधान दिन साजरा करण्यात आला व त्या दिवसाचे महत्त्व अंगणवाडी पर्यवेक्षिका सुचिता कटके यांनी महिलांना संविधान दिनाचे महत्त्व काय याबाबत मार्गदर्शन केले. आणि संविधान दिनाचे महत्त्व सांगण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या..तसेच जिल्हा परिषद प्रशाला भादा कडून गावामध्ये प्रभात फेरी काढून संविधान दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी यांनी सहभागी होऊन संपूर्ण गावातून जनजागृतीचे दिंडी काढण्यात आली...
संविधानातील मर्म म्हणजे आपला देश ज्या कायद्यानुसार चालतो, त्या कायद्याची संहिता असणारे ग्रंथ म्हणजे “भारताचे संविधान” होय. म्हणून त्या ग्रंथाला सर्वोच्च राष्ट्रीय ग्रंथ संबोधणे संयुक्तीक ठरेल, असे वाटते.
भारताचे संविधानाचा सरनामा अर्थात उद्देशिका समजून घेण्याचा प्रयत्न केला तर असे लक्षात येते की, या राष्ट्रीय ग्रंथात मानवीय विचारांची सांगड घातली आहे. असे प्रत्येक कलमाचे अवलोकन केले असता लक्षात येते. म्हणून या ग्रंथाला मानवीय विचारांची संहिता म्हणून स्विकारायला हवी. ती संहिता सृष्टीतील सर्व मानवास मानवीय जीवन सुकर होण्यासाठी मार्गदर्शक आहे. करिता या संहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. जेणेकरून सृष्टीतील कोणत्याही व्यक्तीमध्ये जात, धर्म, लिंग, वंश, प्रांत, भाषा यावरून भेदभाव केला जाणार नाही. वेगवेगळ्या देशात त्यांनी स्विकारल्याप्रमाणे त्या त्या देशातील संविधानानुसार कायदे कानून उपलब्ध असले, तरी भारताचे संविधानातील मानवतावादाच्या उत्थानासाठी अंतर्भूत असलेला सारांश मात्र जगातील मानवाच्या मेंदूत, मनात बिंबविण्याची नितांत आवश्यकता आहे. ज्यामुळे केवळ भारतातीलच नव्हे ! तर जगातील मानवीय समाज समृद्ध होईल. परिणामी जगात शांतता प्रस्थापित होईल. यामुळे अशा पवित्र ग्रंथाचे पावित्र्य राखणे हे प्रत्येक भारतीय जबाबदार नागरिकांचे कर्तव्य असे आहे असे याप्रसंगी विविध बुद्धिजीवी वक्त्याकडून मत व्यक्त करण्यात आले आहे..
0 टिप्पण्या