औसा येथे मंगळवारी पारंपारीक आग्गी सोहळा

 औसा येथे मंगळवारी पारंपारीक आग्गी सोहळा


 

औसा प्रतिनिधी - 

औसा ही संतांची भूमी तर आहेच पण इथे अनेक वर्षापासून अनेक परंपरा आजही अखंडपणे सुरू आहेत.  यातच औशाची खरी थोरवी आहे .  हीच आपल्या औसा शहराची संस्कृती आहे.  आज आपण सर्वजण एका आधुनिक व तंत्रज्ञानाच्या युगात राहत आहोत . पण अशाही वातावरणात आपणच आपली संस्कृती परंपरा व सण समारंभ टिकवून ठेवले पाहिजेत . 

असाच मोठा प्रयत्न औसा येथील सातलिंग स्वामी यांनी सुरू ठेवला व पुढे श्री रामलिंगजी सातलींग स्वामी,श्री अलोक रामलिंग स्वामी आज करत आहेत. औसा येथे श्री विरभद्रेश्वर मंदिरात सामूहिक आग्गी सोहळा दिनांक   22/10/2024मंगळवार रोजी रात्री 7 वाजता  संपन्न होत आहे औसा शहरात ज्या काही पुरातन परंपरा आहेत त्यातील एक प्रमुख परंपरा म्हणजे श्री वीरभद्रेश्वर आग्गी सोहळा . स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही परंपरा औसा येथे आजही अखंडपणे सुरू आहे . आज या महान तेजस्वी परंपरेला जवळपास एकशे तीस वर्ष पूर्ण होत आहेत . अशी परंपरा अखंडपणे सुरू ठेवणे ही सहज साधी सोपी गोष्ट नाही.  त्यासाठी मोठा त्याग , श्रद्धा व भक्ती असावी लागते ही शिकवण श्री रामलिंग स्वामी यांनी आपल्या थोर कार्यातून आपणासमोर सिद्ध केली आहे . 

            औसा येथे स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून परंपरे नुसार चाललेल्या सामूहिक आग्गी सोहळ्या ची पाचव्या पीढिची परंपरा चालू आहे . याची सुरुवात ईरय्या स्वामी या पुरंत स्वामींनी केले. यांचा वारसा पुढे कायम ठेवण्याचे काम मृगय्या स्वामी , बसय्या स्वामी , सातलिंगय्या स्वामी व सद्या रामलिंगय्या स्वामी हे करीत आहेत . या आग्गी सोहळ्या च्या पालखीची मिरवणूक रामलिंग स्वामी यांच्या निवासस्थानापासून वीरभद्रेश्वर मंदिरापर्यंत वाजत गाजत जाते. नंतर कोळशाच्या विस्तवावरून चालण्याची परंपरा व वैज्ञानिक दृष्टिकोनातून आयोजित करण्यात येते तरी सर्व भक्त गणांनी पारंपारिक आग्गी सोहळ्याच्या कार्यक्रमास व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन पारंपारिक आग्गी सोहळ्याचे पुरंत रामलिंग सातलिंग स्वामी ,श्री अलोक रामलिंग स्वामी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या