औशात महायुतीच्या महानिर्धार मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद..
विकासाच्या रुपाने जनतेला भरभरून दिले आता जनतेने आशिर्वादरुपी ताकद द्यावी - आ अभिमन्यू पवार
औसा प्रतिनिधी
औसा - विकासाच्या रुपाने मी जनतेला भरभरून दिले आहे. आता जनतेच्या आशिर्वादाची मला गरज असून जनतेच्या आशिर्वादावर निवडणूक लढविणार असल्याचा निर्धार आ अभिमन्यू पवार यांनी बोलून दाखविला आहे.२५ आॅक्टोबरला उमेदवारी अर्ज भरताना मतदारसंघातील जनतेने उत्स्फूर्तपणे सहभागी होवून आशिर्वाद द्यावा असे आवाहन करताना कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांतून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलत असताना गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कामे पूर्ण केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
औसा विधानसभा मतदारसंघ भाजप - शिवसेना - राष्ट्रवादी - रिपाई - रयत क्रांती संघटना व मित्र पक्षाच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा (दि.२२) आॅक्टोबर रोजी औसा येथे निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आमदार अभिमन्यू पवार बोलत होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष डॉ अफसर शेख, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी आ अभिमन्यू पवार पुढे म्हणाले की विकासाचे मुद्दे खोडता येत नसल्याने विरोधी पक्षाकडून फेक नरेटीव्ह पसरविण्याचे काम केले जात आहे.त्यांनी बोलायचे असेल तर विकासावर बोलावे असे आवाहन करीत आपला अजेंडा विकासाचा अजेंडा असून मतदारसंघाच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरभरून निधी दिला आहे. त्यांच्या आशिर्वादामुळे मतदारसंघातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कामे पूर्ण होत आहेत विशेषता किल्लारी साखर कारखाना, भूकंपग्रस्ताचे प्रश्न, कासारसिरसी व किल्लारी अपर तहसील, एमआयडीसी, शेतरस्ते, रस्ते विकास विषय मार्गी लावता आले.महायुती च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी युती धर्म पाळत विकासाला साथ देण्याचे यावेळी बोलताना आमदार अभिमन्यू पवार यांनी आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज परसने यांनी केले. यावेळी मोठय़ा संख्येने महायुती व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
............................
आमदार अभिमन्यू पवार सारखे आमदार मिळणे अभिमानाची बाब - शिवाजी माने
औशाच्या विकासकामांसाठी आमदार अभिमन्यू पवार यांचा सारखा आमदार मिळाला आहे हि अभिमानाची बाब असून आपण सर्वांनी एकमुखाने त्यांच्या पाठीशी उभे राहावे लागेल. महायुती च्या सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री पदाची संधी मिळू शकते त्यामुळे भरघोस मताधिक्याने त्यांना निवडून देण्याची जबाबदारी आपली आहे.त्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कामे मतदारसंघात झाली असून महायुतीच्या माध्यमातून राज्यात लोककल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या असल्याचे सांगून शिवसेनेचे (शिंदे गट) चे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी अटलबिहारी वाजपेयी व नरेंद्र मोदी यांनी देशाची मान जगात उंचावण्याचे काम केले असून बाळासाहेबांचे विचार उध्दव ठाकरे यांनी पायदळी तुडवले असल्याची टीका त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
आ अभिमन्यू पवार यांनी विकासाबरोबरच जातीय सलोखा राखला - डॉ अफसर शेख
राज्यात विकासाच्या मुद्दय़ावर महायुती एकत्र आली असून या काळात राज्यात विविध लोकहिताच्या योजना या सरकारने राबविण्याचे काम केले आहे. यावेळी भाजपाचे आमदार म्हणून काम करताना अभिमन्यू पवार यांनी औसा शहरासह मतदारसंघात समांतर विकासाचे जाळे निर्माण केले आहे. मुस्लिम समाजाच्या विकासासाठी निधी देत मुस्लिमबहुल भागात मोठय़ा प्रमाणावर विकासकामे केली आहेत. एकीकडे विकासकामे करताना मतदारसंघातील जातीय सलोखा अबाधित ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी केलेले कामे कौतुकास्पद असून मला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औशाला अजित पवार उमेदवार आहेत हे समजून कामाला लागण्याच्या सूचना दिल्या असून महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खांद्याला खांदा लावून काम करायचे आहे. तेव्हा अल्पसंख्याक समाजाने पुर्ण ताकदीने आ अभिमन्यू पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन यावेळी केले.
.
0 टिप्पण्या