रमेश आप्पा कराड यांच्या उमेदवारीचे लातूर ग्रामीण मध्ये उस्फुर्त स्वागत..

 रमेश आप्पा कराड यांच्या उमेदवारीचे लातूर ग्रामीण मध्ये उस्फुर्त स्वागत..


 औसा प्रतिनिधी

 लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातून सर्वसामान्य जनतेच्या सतत संपर्कामध्ये राहून जनसेवा करणारे विधान परिषद सदस्य रमेश आप्पा कराड यांना भारतीय जनता पार्टीने विधानसभेची उमेदवारी दिली आहे. दोन वेळा विधानसभेला पराभव झाल्यानंतर सुद्धा मतदार संघातील जनतेमध्ये सतत नाळ कायम ठेवत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या पक्ष संघटन कार्याला उभारी दिल्यामुळे पक्ष नेतृत्वाने यावेळी त्यांना पुन्हा संधी दिली आहे. भारतीय जनता पार्टी मधून उमेदवारी मिळाल्याबद्दल लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांच्या चहाट्याकडून उस्फुर्त स्वागत होत आहे. औसा लातूर आणि रेणापूर तालुक्यातील गावागावातील सरपंच व पक्षाचे पदाधिकारी हितचिंतकांनी रमेशआप्पा कराड भेट घेऊन  सत्कार करुन  शुभेच्छा दिल्या. वानवडा येथे राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मांडण निवड समितीचे सन्माननीय सदस्य फुलचंद अंधारे यांनीही रमेश आप्पा कराड यांचा सत्कार करून विजयासाठी शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या