आता लातूर ग्रामीणमध्ये होणार काट्याची टक्कर...
आ. कराडांच्या तिकिटाने भादा येथे जल्लोष ...!
औसा प्रतिनिधी
औसा: लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांना पहिल्याच यादीमध्ये उमेदवारी मिळाली आणि काँग्रेस करते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी विविध कार्यक्रमांचे नियोजीत आयोजन करून काँगेस कडून मतदारांची जमवा जमव सुरू होती.
तर लातूर ग्रामीणमध्ये तिकीट मिळविण्यासाठी मागील दहा ते पंधरा दिवसापासून माजी आमदार त्रिंबक भिसे यांचे बंधू शंकरराव भिसे आणि आ. रमेश कराड यांच्याच नावाची या भागामध्ये मोठी चर्चा सुरू होती परंतु नुकतेच भाजपा विधान परिषदेचे आमदार रमेश कराड यांना विधानसभेचे तिकीट जाहीर झाल्याने भादा तालुका औसा येथील भाजपाचे कार्यकर्ते यांनी फटाक्यांची आतीशबाजी करत मोठा जल्लोष साजरा केला.कारण गेल्या टर्मला आ. कराड यांनी तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न केला परंतु पक्षाने तिकीट न दिल्याने आणि सदरील जागेची अगोदरच राजकीय सेटलमेंट झाल्याची चर्चा या भागांमध्ये होती. ती आताही होती परंतु रमेश कराड हे पक्षाने तिकीट नाही दिल्यास पक्षातील कार्यकर्त्यांच्या बळावर अपक्ष लढण्याची तयारी पूर्ण केली होती अशीही चर्चा आहे.त्यामुळे भाजपाकडून आ. रमेश कराड यांना मागच्या टर्मला तिकीट देण्यात आले नाही यामुळे या भागातील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात नोटाला मतदान करून आपला रोष मतदानातून व्यक्त केला तर नोटाला मतदान करणे म्हणजे आ. रमेश कराड यांच्यावरील जनतेचे असलेले निस्सिंम प्रेम सिद्ध होते. याच जोरावर यावेळी आमदार रमेश कराड यांनी पक्ष श्रेष्ठींना धारेवर धरून स्वतःच्या वजनाचा वापर करून आणि कार्यकर्त्यांचे इच्छा राखण्यासाठी सरळ निवडणूक लढतीमध्ये उडी घेन्यासाठी पक्षाकडून शनिवार दिनांक 26 ऑक्टोंबर रोजी कायदेशीररीत्या तिकिट हस्तगत केले.यामुळे या भागातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष दिसून येत आहे.
हजारो साजरा करीत असताना या भागातील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात दारूची अतिशबाजी करून तिकीट मिळाल्याचा मोठा आनंद व्यक्त करताना भाजपा कार्यकर्ते आणि आ रमेश कराड समर्थक मोठ्या उत्साहात दिसून आले.त्यामुळे आता होणारी लातूर ग्रामीणची निवडणूक ही मोठी चुरशीची निर्माण झाली असून गावा गावांमध्ये काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते मोठ्या विजयी नियोजनासाठी तयार झाले असून विजय आपलाच आहे!हीच भाषा या भागामध्ये प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याकडून केली जात आहे.यामुळे कोण निवडून येणार याकरिता नागरिकांची मोठी गर्दी खेचण्यासाठी जो तो पक्ष प्रयत्न करणार असल्याचे तयारी पूर्ण चित्र दिसून येत आहे.
0 टिप्पण्या