औसा मतदार संघासाठी सोमवारी 13 उमेदवारांचे अर्ज दाखल

 औसा मतदार संघासाठी सोमवारी 13 उमेदवारांचे अर्ज दाखल 


औसा प्रतिनिधी 

239 औसा विधानसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी एकूण 13 उमेदवारांनी 17 नामनिर्देशन पत्र दाखल केले यामध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे विद्यमान आमदार अभिमन्यू पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना माजी आमदार दिनकरराव माने, दिनकर तुकाराम सूर्यवंशी, आकाश महादेव पुजारी, जावेद पटेल, दगडू  वसंत माने, सुरज बरमदे, नवशात शेख, प्रदीप सौदागर, चिंचोलकर आणि विजयकुमार घाडगे यांचा उमेदवारी दाखल करणाऱ्या मध्ये समावेश आहे. 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी एकूण 13 उमेदवारांनी अर्ज भरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कोरडे आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार घनश्याम अडसूळ यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या