औसा शहरातील सुसज्ज बस स्थानकाचा उद्या भव्य लोकार्पण सोहळा
औसा प्रतिनिधी
औसा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नातून औसा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भव्य दिव्य बस स्थानकाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी दहा वाजता ऑनलाईन प्रणालीद्वारे महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे आमदार तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे या कार्यक्रमांमध्ये धाराशिव चे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, विधान परिषद सदस्य विक्रम काळे, सतीश चव्हाण, रमेश आप्पा कराड ,माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार बाबासाहेब पाटील आमदार अभिमन्यू पवार, आमदार धीरज देशमुख, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर आणि औसा नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नाने आणि युवा उद्योजक इम्रान जमील सय्यद यांच्या माध्यमातून आवसा शहरातील सर्व सुविधांनी उपयुक्त बस स्थानकाच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी सर्व निमंत्रित मान्यवर व नागरिकांनी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गणेश राजगिरे कार्यकारी अभियंता राज्य परिवहन महामंडळ छत्रपती संभाजी नगर अश्वजीत जानराव विभागीय व्यवस्थापक राज्य परिवहन महामंडळ लातूर आणि श्रीमती अमृता ताम्हणकर प्रादेशिक व्यवस्थापक नाशिक व छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या