ओबीसी आरक्षण टिकण्यासाठी संघटित शक्ती महत्वाची -प्राध्यापक लक्ष्मण हाके

 ओबीसी आरक्षण टिकण्यासाठी संघटित शक्ती महत्वाची -प्राध्यापक लक्ष्मण हाके 


औसा प्रतिनिधी 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा संवैधानिक अधिकार दिला आहे. ओबीसी प्रवर्गामध्ये शेकडो जातीचा समावेश असताना विशिष्ट जाती समूहाचा समावेश ओबीसी प्रवर्गामध्ये करण्याच्या जोरदार हालचाली सुरू असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील राजकीय नेते ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी भाषा बोलतात तर दुसरीकडे हेच लोकप्रतिनिधी विशिष्ट जातीचा मागणीचा विचार करीत पाठिंबाचे देखील पत्र देत आहेत त्यामुळे ओबीसी आरक्षण टिकणार किंवा नाही याबाबत ओबीसी प्रवर्गामध्ये भेटीचे वातावरण पसरले आहेत. ओबीसी प्रवर्गातील आरक्षण टिकण्यासाठी एकच पर्व ओबीसी सर्व या बॅनर खाली सर्व ओबीसी भटके व विमुक्त जाती समूहाच्या जनतेने संघटित शक्ती उभी केली पाहिजे असे प्रतिपादन ओबीसी संघर्ष योद्धा प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केले. औसा येथील मुक्तेश्वर मंगल कार्यालय मध्ये आयोजित मेळाव्यामध्ये ते बोलत होते. रविवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी आयोजित मेळाव्यासाठी नवनाथ आबा वाघमारे, हरिभाऊ गायकवाड, सौ .मंजुषा निंबाळकर, आदिवासी नेते रामराजे आत्राम, मुस्लिम ओबीसी संघटनेचे शब्बीर भाई अन्सारी, गोपाळ बुरबुरे, प्राध्यापक सुधीर पोतदार यांच्यासह अनेक मान्यवर विचार पिठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना नवनाथ आबा वाघमारे म्हणाले की ओबीसी समाजामध्ये 12 बलुतेदारांसह अठरापगड जाती समूह विखुरलेला आहे समाजाचे सामाजिक शैक्षणिक आर्थिक व राजकीय मागासले पण कायम असल्यामुळे ओबीसी आरक्षण टिकणे अत्यंत गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी मुस्लिम ओबीसी संघटनेचे शब्बीर भाई अन्सारी यांनीही उपस्थितांना  मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रेय घोगरे यांनी केले प्रारंभी महात्मा बसवेश्वर छत्रपती शिवराय राजर्षी शाहू महाराज महात्मा फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून मेळाव्याचे उद्घाटन झाले. मुक्तेश्वर मंगल कार्यालय औसा येथे आयोजित ओबीसीच्या एल्गारत मेळाव्यामध्ये धनगर, माळी, बंजारा, वडार, गोंधळी, वासुदेव, जोशी, कुंभार, न्हावी, मशीन जोगी, बंडी धनगर यांच्यासह विविध समाजाचे नागरिक व विशिष्ट समाजाचे पारंपारिक वेशभूषा धारण करून सहभागी झाले होते. या मेळाव्यासाठी हजारो ओबीसी भटके व विमुक्त यांच्यासह मुस्लिम ओबीसी व दलित बांधव तसेच महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम कांबळे आणि गजेंद्र गिरी यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री चांगदेव माळी, हनुमंत कांबळे, युवराज चव्हाण, अनिल जाधव, सचिन माळी, विशाल माळी, श्याम गोरे, एन जी माळी, ॲडव्होकेट नितीन मेहत्रे, सुधाकर मेहत्रे, नारायण माळी, सुधाकर खडके, माणिकराव फुटाणे, गंगाधर विसापूर, नितीन बंडगर यांच्यासह तरुण ओबीसी कार्यकर्ते प्रयत्नशील होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या