औश्याच्या शासकीय प्रशिक्षण संस्थेस शांतीरप्पा जळकोटे गुरुजींचे नाव
नामकरण सोहळा उत्साहात
संपन्न
औसा _ येथील शासकीय प्रशिक्षण संस्था (आय टी आय) या संस्थेस कै. शांतीरप्पा पंचाप्पा जळकोटे यांचे नाव देण्याचे जाहीर केले होते.त्यानुसार आ.अभिमन्यू पवार या हस्ते संस्थेच्या नामकरण फलकाचे अनावरण रविवारी एका कार्यक्रमाद्वारे करण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आ.अभिमन्यू पवार म्हणाले की,औसा तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले शांतीरप्पा जळकोटे गुरुजी यांचे नाव कायमस्वरूपी स्मरणात रहावे म्हणून महाराष्ट्र शासनाने औश्याच्या औघोगिक प्रशिक्षण संस्थेस त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. जळकोटे गुरुजींचे विद्यार्थी आज देशातच नव्हे तर विदेशात उच्च पदावर काम करत असून औशाचा नावलोकिक वाढवित असल्याचे सांगून जळकोटे गुरुजी यांचा अर्धाकृती पुतळा या संस्थेच्या प्रांगणात उभा करण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला.याप्रसंगी कुलभूषण जळकोटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास सुभाष जाधव,माजी नगराध्यक्ष किरण उटगे,सुनिल उटगे,धनंजय परसणे,प्राचार्य रणभिडकर मॅडम ,शिष्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या