ओबीसी भटक्या विमुक्तांचा उद्या औसा येथे एल्गार मेळावा ...
औसा प्रतिनिधी
आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सत्यशोधक चळवळीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव घेऊन पुरोगामी विचाराचे आम्हीच पुरस्कर्ते आहोत अशा वल्गना करीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांनी पुरोगामी महाराष्ट्रातील ओबीसी भटके व विमुक्त यांच्या आरक्षणाचे संरक्षण करण्याची ठोस भूमिका जाहीर करीत नाहीत दुसरीकडे विशिष्ट समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा असल्याचे पत्र देत असल्याने ओबीसी आणि भटके विमुक्त समाजामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महाराष्ट्र राज्यातील ओबीसी आणि भटक्या विमुक्त संख्या आरक्षणाचे संरक्षण व्हावे या उद्देशाने शनिवार दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता मुक्तेश्वर मंगल कार्यालय औसा येथे सकल ओबीसी दलित भटके अल्पसंख्यांक समाजाचा एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास प्रमुख वक्ते म्हणून आंदोलनाची लढाई, रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढाई, लढणारे संघर्ष योद्धा प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ आबा वाघमारे हे मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती ॲड. गोपाळ बुरबुरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. औसा येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत रघुनाथ मदने, एन जी माळी, ॲड. नितीन म्हेत्रे, श्याम गोरे, रणधीर हाके आदी मान्यवर उपस्थित होते. या महाएल्गार मेळाव्यामध्ये ओबीसीची जातगणनिहाय जनगणना करावी, ओबीसी व भटक्या विमुक्त त्याचे एकत्रित रित्या आरक्षण टिकविण्यासाठी समाजात जनजागृती व्हावी, ओबीसी प्रवर्गामध्ये इतर जाती समूहाचा शिरगाव रोखणे रोहिणी आयोगाचे अंमलबजावणी करावी तसेच ओबीसी प्रवर्गाला लोकसंख्येच्या प्रमाणात विधानसभा लोकसभेमध्ये राजकीय वाटा मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करणे या उद्देशाने आयोजित मेळाव्यासाठी औसा तालुक्यातील सकल ओबीसी दलित भटके व अल्पसंख्यांक समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या