औसा मतदारसंघावर महिला शिवसेनेचा दावा तालुक्यातील सक्षम महिला उमेदवार म्हणून संगिताताई लातूरकर यांच्या नावाची जोरदार चर्चा

 औसा मतदारसंघावर महिला शिवसेनेचा दावा


तालुक्यातील सक्षम महिला उमेदवार म्हणून संगिताताई लातूरकर यांच्या नावाची जोरदार चर्चा 



औसा प्रतिनिधी: 


औसा विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघात असून मागील अनेक निवडणुकीत शिवसेनेचे आमदार या मतदारसंघात राहिले असून काही झाले तरी औशांची जागा हि शिवसेनेलाच सुटणार असल्यांची घोषणा शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी औसा येथे आयोजित मेळ्याच्या प्रसंगी  बोलताना केल्यांने तालुक्यातील उबाठा शिवसेनेच्या वतीने अनेक इच्छुक मैदानात उतरले असून त्यामध्ये औसा तालुक्यातील पहिल्यांदाच महिलांना उमेदवारी मिळावी यासाठी  संगिताताई लातूरकर  यांनी औसा मतदारसंघातून उमेदवारीसाठी मागणी पक्षाकडे मागणी केली आहे.औसा तालुक्यातील शेतकरी समस्या,वाढती बेरोजगारी भीषण पाणीटंचाई, विकासाची निर्माण झालेली दरी, आणि एकही नवीन प्रकल्प उभारणी नसल्याने नुसता आश्वासन व उद्घाटनाच्या घोषणा मुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. औसा विधानसभा मतदारसंघाला विकासाच्या प्रवाहात आणून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून तरूणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी व औसा शहराचा कायापालट करून महिलांना स्वावलंबी व स्वयंपूर्ण बनवण्यासाठी त्यांच्या  समस्या सोडवण्यासाठी आता महिला शिवसेना पुढाकार घेणार आहे.पक्षाच्या वरिष्ठांशी याबाबत आपण चर्चा असून महिला नेतृत्वाला औसा मतदारसंघासाठी प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळवून द्यावी यासाठी उबाठा शिवसेनेचे सर्वेसर्वा श्रध्देय उध्दव बाळासाहेब ठाकरे,शिवसेनेची बुलंद तोफ खा संजयजी राऊत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे  यांच्याकडे उमेदवारी मिळावी यासाठी मागणी केल्यांची माहिती संगिताताई लातूरकर यांनी पक्षाकडे  केली आहे. पक्षाच्या वरिष्ठांनी औसा मतदारसंघातून महिलेला उमेदवारी देण्यासाठी सकारात्मक विचार केला असून पक्ष श्रेष्ठी आपणास औसा मतदान संघातून उमेदवारी देणार असल्याचे ठाम विश्वास संगिताताई लातूरकर यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना व्यक्त केले आहे. आपणास पक्षाने संधी दिल्यास तालुक्यातील सर्व प्रश्न मार्गी लावत लातुरच्या बरोबरीने औसा मतदार संघाला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी आपण निश्चीतपणे प्रयत्न करू असेही त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाल्या.पक्षाचे निष्ठेने केलेले कार्य, समाजातील सर्व घटकांना सन्मान न्याय मिळवून देण्यासाठी व वंचित घटकांना प्रवाहात आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा यासाठी शेतमालांशी निगडीत उद्योग उभारणी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते त्या प्रसंगी बोलताना म्हणाल्या.जर उबाठा शिवसेना पक्षाने महिला उमेदवार दिल्यास कोणाचा बळी जाईल हे येणारा काळच ठरवेल असेही त्या म्हणाल्या.औसा मतदारसंघातून जर महिलेला संधी दिल्यास नक्कीच तालुक्यातील इतिहासातील पहिली महिला आमदार होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.तसेच त्यांचा सामाजिक, राजकीय, कर्तव्याची जाणीव असणाऱ्या महिलेच्या माध्यमातून उमेदवारी दिली तर  समाजातून मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे पक्षश्रेष्ठीं कसा विचार करतील हे पहाणे गरजेचे आहे.विद्यमान आमदार पवार यांना तोडीस तोड उमेदवार म्हणून मोठ्या हिमतीने पक्षांने संधी दिल्यास लढणार असल्याचे ते याप्रसंगी बोलताना म्हणाल्या.त्यांना कसल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना कार्यातून स्वतः ची ओळख निर्माण केली असल्याने जनतेतून महिला वर्गातून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी मागणी जोर धरू लागली असून त्या अनुषंगाने मतदारसंघात बैठका सुरू केल्या आहेत. व जनतेतून मोठ्या प्रमाणात पाठिंबाही मिळत असल्याचे त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या