तुळजापूर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या आर्थिक क्रांतीसाठी प्रतिनिधित्वाला संधी द्या -
अँड.व्यंकटराव गुंड
तुळजापूर प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यातील प्रस्थापित राज्यकर्त्यांनी मागील अनेक वर्ष संधी मिळून सुद्धा जिल्ह्याचे मागासने पण कायम ठेवले आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील ऊस सोयाबीन तूर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग व शेतीपूरक उद्योग उभारणी कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपला जिल्हा कायम मागास राहिला आहे जिल्ह्याची विभागणी होऊन लातूर जिल्हा निर्मिती झाली आणि लातूर मध्ये उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती शैक्षणिक पॅटर्न आणि सुमारे 10 किलोमीटर क्षेत्रामध्ये एमआयडीसी निर्माण करून हजारो लोकांना रोजगार निर्मितीची संधी प्राप्त झाली आहे. रूपामाता उद्योग समूह मधून रुपामाता दूध संकलन केंद्र, शेतमाल तारण योजना, रुपामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, रूपामाता अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि रूपामाता मनोरमा नॅचरल शुगर्स यासह शिक्षण संस्था सुरू करून तुळजापूर मतदारसंघांमध्ये 70 हजार परिवाराशी जवळीक निर्माण केली आहे. आगामी काळात तुळजापूर विधानसभा मतदारसंघात प्रतिनिधित्व करण्याची संधी जनतेच्या आशीर्वादाने मिळाली तर आता तुळजापूर रेल्वेच्या नकाशावर येणार असल्यामुळे सोयाबीन तूर आणि हरभरा शेती उत्पादनावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची उभारणी करून रोजगाराच्या शोधात मतदार संघातील जाणारे तरुणांचे लोंढे रोखण्यासाठी स्थानिक तरुणांना आपल्या परिसरात रोजगार निर्मिती करून मतदार संघातील शेतीपूरक उद्योगाला चालना देऊन शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन ॲड व्यंकटराव गुंड यांनी केले. तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा येथील मनोरमा रूपामाचा नॅचरल शुगर्स युनिट तीनच्या बॉयलर अग्नी प्रदीप पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुधाकर गुंड गुरुजी हे होते प्रारंभी नंदगाव तालुका तुळजापूर येथील विरक्त मठाचे श्री मनी राजेश्वर महास्वामी, ह भ प पांडुरंग महाराज लोमटे, व ह भ प बाबुराव महाराज पुजारी यांच्या हस्ते बॉयलर प्रदीप पण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संत दादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे चे कृषीव्यता डॉक्टर गणेश पवार, प्रगतिशील शेतकरी सत्यवान सुरवसे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना ऍड वेंकटराव गुंड म्हणाले की रुपामाताचा उद्योग समूहाच्या माध्यमातून मतदार संघातील हजारो शेतकरी बेरोजगार युवक महिला दूध उत्पादक यांच्यासह सुमारे 1100 कर्मचारी यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे अतिशय कष्टाने पिकविलेल्या उसाला प्रति टन 2800 रुपयांचा विक्रमी भाव देऊन रुपामाता परिवाराने आपली विश्वासार्हता जोपासली आहे जिद्द चिकाटी आणि प्रामाणिक पणा यांच्या बळावर कुटुंबाला कसल्याही प्रकारचा राजकीय वारसा नसताना आर्थिक शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये मतदार संघातील जनतेने विश्वास टाकला असला तरी भारतीय जनता पार्टीची विचारधारा घेऊन मागील वीस वर्षापासून निष्ठेने काम करीत असताना पक्षनेतृत्वाने मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली नाही आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेतृत्वाने संधी दिल्यास आपण जनतेच्या विश्वासाला तडा न जाऊ देता मतदार संघातील सर्व क्षेत्रातील जनतेच्या विश्वासाला पात्र राहून काम करू अशी ग्वाही शेवटी ऍड व्यंकटराव गुंड यांनी दिली. देवसिंगा येथे आयोजित बॉयलर अग्नी प्रदीप पण कार्यक्रमासाठी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील हजारो सभासद ऊस उत्पादक शेतकरी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या