कै.गुंडामाय पाटील यांनी बांधलेले शेतकरी निवास शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्याची मागणी..

 कै.गुंडामाय पाटील यांनी बांधलेले शेतकरी निवास शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्याची मागणी..



औसा प्रतिनिधी 

 दि.23/01/2023 रोजी आपल्या कार्यालयात आणि त्यानंतर वारंवार कै. गुंडामाय पाटील यांनी बांधलेले शेतकरी निवास शेतक-यांच्या ताब्यात देण्यात यावे म्हणून निवेदन देण्यात आले होते,परंतू निवेदन देवूनही कार्यवाही झाली नाही त्यामुळे दि. 09/10/2024 रोजी औसा येथील बसस्थानक जवळ  असलेलें लघु पाटबंधारे विभाग कार्यालय समोर मातोश्री गुंडामाय सेवा प्रतिष्ठानच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले.या लाक्षणिक उपोक्षणात त्यांचे असे म्हणने आहे की,


 औसा तालुक्यातील नणंद या गावचे रहिवाशी असलेल्या कै. गुंडामाय सदाशिव पाटील यांनी त्यांच्या स्व. मुलांच्या स्मरणार्थ 1963-64 साली औसा येथे शेतक-यांच्या सोईसाठी शेतकरी निवास औसा शहरातील स.नं. 88 गायराण जमीनीवर शेतक-यांच्या उपयोगासाठी शेतकरी निवास बांधून दिले होते. त्या जागेवर लघु पाटबंधारे विभाग यांचे कार्यालय, बेकायदेशीरपणे कब्जा करुन चालविले जात आहे. तसेच औसा तालुक्यातील ग्रामिण व शहरी भागातील लोकांची सेवा करण्यासाठी औसा येथे ग्रामीण रुग्णालय कै. गुंडामाय पाटील  यांनी बांधून दिलेले आहे. तरी औसा येथील कै.गुंडामाय पाटील ग्रामिण रुग्णालय असे नामाकरण करण्यात यावे.अशी  मागणी लाक्षणिक उपोषण कर्त्यांनी केली. तरी वरील विषयाच्या अनुषंगाने मातोश्री गुंडामाय सेवा प्रतिष्ठान औसा यांच्या वतीने वारंवार आपणास निवेदने देऊन समक्ष भेटून अनेक वेळा विनंती ही केली तरीही कसलीही कार्यवाही न होऊन आजतागायत शेतकरी निवास  हे शेतकऱ्यांच्या  सोयीसाठी बांधलेले असून सुद्धा लघु पाटबंधारे यांचे कार्यालय तेथेच चालू आहे.त्यामुळे मातोश्री गुंडामाय सेवा प्रतिष्ठानच्या  वतीने बुधवार 9 अॉक्टोंबर रोजी  लघु पाटबंधारे कार्यालय समोर  एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.यावेळी मातोश्री गुंडामाय सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विलास लिंमराज लंगर, उपाध्यक्ष विष्णू  निवृत्ती कोळी, सचिव असलमखान गुलाम कादरखान पठाण आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या