*मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन*
*जि.प.प्रा.शा.बुधोडा येथे उत्साहात साजरा*
आज दि. 17/09/2024 रोजी जि.प.प्रा.शा.बुधोडाच्या शालेय प्रांगणात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,श्री.अमरदीप कांबळे.उपाध्यक्षा सौ.हसीना शेख यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमा पुजनाने आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री.महादेव बिरादार सरांच्या हस्ते ध्वजारोहन कार्यक्रमाने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
तसेच *स्वच्छता हिच सेवा* उपक्रमा अंतर्गत *स्वच्छता शपथ घेऊन ग्राम स्वच्छता फेरी* काढण्यात आली.
आणि उल्लेखनीय बाब म्हणजे सरदार पटेल आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्यावर आधारीत स्पर्धा परीक्षा घेऊन लागलीच निकाल जाहीर करण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते पारितोषक वितरण करण्यात आले.
मराठवाडा मुक्ती दिनांनिमित्त कार्य क्रमाची रूपरेषा श्री. बिरादार सरांनी प्रस्थावनेतुन मांडली तर शिक्षक मनोगत श्रीमती पाटील मॅडम यांनी व्यक्त केले. विदयार्थ्यांचीही उत्स्फूर्त भाषणे झाली. स्पर्धा परीक्षा विभाग कु.पूनम माने मॅडमनी सांभाळला आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षिका भगिनींनी मदत केली.सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन श्रीमती भारत कांबळे मॅडम यांनी करून आभार मानले व कार्य क्रमाची सुंदर सांगता केली.
0 टिप्पण्या