भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वर्षावासचे आयोजन..

 भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वर्षावासचे आयोजन..



औसा प्रतिनिधी 


 भारतीय बौद्ध महासभा औसा आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेत आज दिनांक १७/९/२०२४ रोजी सायंकाळी 5 वाजता भिमनगर बुद्ध विहारात व सायंकाळी 6 वाजता त्रिरत्न बुद्ध विहार समता नगर औसा येथे आदरणीय नानासाहेब आव्हाड (कंपनी कमांडर, समता सैनिक दल लातूर) यांनी सुर्यपुत्र यशवंतराव भैय्यासाहेब आंबेडकर यांचे अमुल्य योगदान या विषयावर प्रवचन दिले.कार्यक्रमाच्या प्रारंभी सुर्यपुत्र यशवंतराव भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिना निमित्त अभिवादन करण्यात आले.यशवंतराव ऊर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जीवन व कार्य, संघर्ष यावर सखोल प्रकाश प्रवचनकार नानासाहेब आव्हाड यांनी टाकला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु.दिलीप बौद्धविर यांनी केले तर आभार प्रदर्शन व अध्यक्षीय समारोप ॲड धम्मदिप डांगे तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा औसा यांनी केले.यावेळीआयु. उद्धव लोंढे गुरुजी मा.तालुका अध्यक्ष, आदित्य कांबळे,लोखंडे मामा, तालुका महिला सरचिटणीस ज्योती डांगे, रंजना हावळे, सुनिता गौतम लोंढे, समता सैनिक दल महिला सैनिक प्रिया कांबळे, पंचशीला बनसोडे, पार्वती बनसोडे, रुक्मिणीबाई गंगावणे, मंगल विलास बनसोडे,तर समतानगर महिला शाखाध्यक्ष पुष्पाताई गायकवाड,

भारतीय बौद्ध महासभा महिला कार्यकारिणी सदस्या आशा कांबळे, जनाबाई जाधव,निताताई सुर्यवंशी, उर्मिला कांबळे, शशिकला सुर्यवंशी, सुजाता सेलूकर, सुलभा कांबळे,सुमन सुर्यवंशी,नंदाताई लोंढे व बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या