पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त वेदांत मेडिकल तर्फे हेल्थ कीट वाटप..
औसा प्रतिनिधी
देशाचे कर्तबगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील वेदांत मेडिकल संचालक अमित सुरेशप्पा राचट्टे आरोग्याची काळजी घेण्यासाठी व प्रथमोपचार वेळेत घेता यावा या उदात्त हेतूने थर्मामीटर, वेदनाशामक मलम व गोळ्या तसेच सर्दी, ताप, खोकला या सर्वसामान्य आजारा वर उपचार घरच्या घरी घेता यावा म्हणून रामलिंग मुदगड येथील मठाधिपती सद्गुरू श्री सदानंद महाराज यांच्या हस्ते व भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सुनील उटगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये केले. यावेळी संघचालक रुपेश कारंजे, कंठप्पा मुळे, शिवरुद्र मुर्गे, संदीप पाटील, धम्मदीप जाधव ,अर्जुन ढगे, विकास कटके, दिगंबर कलमे, राजाभाऊ फुलारी, प्रदीप कारंजे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. औसा शहरातील गणेश नगर व परिसरातील 50 लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हेल्थकीट मोफत देण्यात आले तर वेदांत मेडिकल गणेश नगर औसा येथे नोंदणी केलेल्या लाभधारकांना घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात येईल अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक अमित राचट्टे यांनी दिली.या कार्यक्रमासाठी औसा शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच लाभार्थी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या