औसा येथे ईद -ए -मिलादुन्नबी निमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न..

 औसा येथे  ईद -ए -मिलादुन्नबी निमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न..



45 रक्तदात्यांनी केले रक्तदान.. 


औसा प्रतिनिधी 


संपूर्ण जगाला शांतीचा आणि एकतेचा संदेश देणारे 

इस्लाम धर्माचे प्रेषीत हजरत मुंहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त  त्यांचे औचित्य साधत मुस्लिम समाजाच्या तरुणांच्या वतीने अनावश्यक बाबींना फाटा देत  ईद -ए -मिलादुन्नबी निमित्त रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून हे इबादत आणि जिवनदानही आहे.या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्या अनुषंगाने औसा शहरातील हसीना ऊर्दू गर्ल्स स्कूल येथे 16 संप्टेबर 2024  सोमवार रोजी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत रक्तदान शिबीर  कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी खा.ओमराजे निंबाळकर , अजित पाटील कव्हेकर,  कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, माजी आमदार दिनकर माने, संतोष सोमवंशी,काॅग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अमर खानापुरे, अँड मजहर शेख, सुरेश भुरे,वसीम खोजन,बालाजी साळुंखे,अनिस जहागीरदार,नियामत लोहारे, खुंदमीर मुल्ला,खाजा शेख,नदीम सय्यद आदिच्या प्रमुख उपस्थितीत हा रक्तदान शिबीर कार्यक्रम घेण्यात आला.या शिबिरामध्ये 45  रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले. रक्तदान केलेल्यांना  प्रमाणपत्र देण्यात आले.या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.या रक्तदान शिबिरात संजिवनी ब्लड सेंटर लातुचे रुतुजा सुर्यवंशी,प्रतिभा शेळके,निता साळुंखे यांच्या टिमने सहकार्य केले.हा रक्तदान शिबीर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी साहिल सय्यद,आरबाज पठाण,अशरफ सय्यद,खाजा शेख,शाहदाब हन्नुरे, अल्ताफ सय्यद आदिनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या