शेतकऱ्यांच्या प्रश्नी विजयकुमार घाडगे यांच्या उपोषणाची सरकार दखल घेत नसल्याने महिला पुरुष शेतकरी घेणार जलसमाधी
औसा :सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. शेतकरी उपाशी अन भांडवलदार तुपाशी अशी गत झालेली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विजयकुमार घाडगे पाटील अमरण उपोषणास बसले आहेत. आज उपोषणास नऊ दिवस झालेत, हे उपोषण उठावे म्हणून सर्व लोक देवाला प्रार्थना, आरत्या घालून साकडे घालत आहेत. विविध संघटना, पक्ष बाजूला ठेऊन मी शेतकरी या नात्याने वेगवेगळे आंदोलन, मोर्चे, धरणे, ट्रॅक्टर रॅली काढून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु त्यात अजिबात यश येत नसून सरकार शेतकरी विरोधी असल्याने सरकारचे चुकीचे धोरण हेच शेतकऱ्याचे मरण ठरत आहे.
राज्यात शेतकऱ्याचा संघर्ष योद्धा रविकांत तुपकर सातत्याने विविध स्वरूपाचे आंदोलन करुन सरकार सोबत चर्चा करताहेत परंतु कुठलाच निर्णय होत नाही. श्री घाडगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत जाऊन अत्यंत गंभिर बनलेली आहे. त्यामुळे आम्ही आज प्रशासनासोबत चर्चा केली परंतु कसलाही वरिष्ठ पातळीवरून पत्रव्यवहार झालेला नाही, त्यामुळे उद्यापर्यंत निर्णय घ्या अन्यथा औसा येथे महिला पुरुष असे सामूहिक पद्धतीने शेतकरी दिनांक 28 सप्टेंबर रोजी जलसमाधी घेणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांना निवेदनद्वारे तहसीलदार मार्फत राजेंद्र आबा मोरे, शीतल तमलवार, दत्ता किणीकर आणि राजीव कसबे यांनी दिला आहे.
0 टिप्पण्या