युवा भीमसेनेचा औसा तहसीलवर मोर्चा
औसा प्रतिनिधी
युवा भीमसेनेच्या वतीने औसा येथील ऍप्रोच रोड चौकापासून तहसील कार्यालयापर्यंत युवा भीमसेनेचे पंकज काटे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. औसा शहरांमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून पुतळा उभारण्यात यावा आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपये हमीभाव द्यावा या मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून मागण्याचे निवेदन शिष्टमंडळाला देण्यात आले. या मोर्चामध्ये युवा भीमसेनेचे तरुण कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाचे रूपांतर तहसील कार्यालय समोर जाहीर सभेत झाल्यानंतर युवा भीमसेनेचे संस्थापक पंकज काटे यांनी मोर्चे करांना संबोधित केले.
0 टिप्पण्या