विद्यार्थ्यांनींच्या सुरक्षतेसाठी जनजागृती समिती हवी -जयश्रीताई उटगे
औसा प्रतिनिधी
बदलापूर येथील एका खाजगी शाळेतील दोन विद्यार्थिनीवर नराधमाने अत्याचार केल्यानंतर महाराष्ट्रात अशा अनेक घटना घडत आहेत लग्नाचे आमिष दाखवून औसा तालुक्यात झालेल्या बलात्काराची घटना ताजी असतानाच औसा तालुक्यातील भेटा येथील 70 वर्षीय महिलेवर बलात्कार करून खून केल्याची घटना घडल्यामुळे विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षिततेची मोठी गरज निर्माण झाली आहे. विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी विद्यार्थिनी व पालक वर्गामध्ये जनजागृती करण्यासाठी समिती असायला हवी असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या जयश्रीताई उटगे यांनी केले. औसा येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. शहरातील काही खाजगी शाळा ट्युशन क्लासेस आणि मुलींचे वस्तीग्रह या ठिकाणी भेट देऊन आपण शाळेतील शिक्षक वस्तीगृह चालक आणि खाजगी ट्युशन चालक यांच्याशी चर्चा केली असून शालेय शिक्षण व ट्युशन साठी बाहेर पडलेल्या विद्यार्थिनी घरी येईपर्यंत पालक वर्गात चिंता असते यासाठी पालक वर्गानेही जागृत राहणे आवश्यक आहे. स्कूलबस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बस स्थानक व ट्युशन परिसरामधील रोड रोमिओ चा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची गस्त वाढविणे, प्रत्येक विद्यार्थिनींना शाळेतील ओळखपत्र देणे, विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार होऊ नयेत यासाठी गुड टच आणि बॅड टच याबाबत प्रशिक्षित महिला पोलीस कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्या मार्फत शहरातील शाळेमध्ये जाणीव जागृती निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले. शहरातील महिला सामाजिक कार्यकर्त्या पत्रकार, महसूल कर्मचारी व गटशिक्षण अधिकारी कार्यालय आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती करण्यासाठी समिती स्थापन केली पाहिजे असे सांगून विद्यार्थिनी व पालक यांच्यामध्ये प्रबोधन करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन जयश्रीताई उटगे यांनी केले. यावेळी अशोक कुंभार, सुरेश भुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या