इंदिरानगर औसा येथील कैकाडी वस्तीत पाणी घुसल्याने नागरिक परेशान
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील इंदिरानगर येथील कैकाडी वस्तीत पावसाचे पाणी घुसले असुन
औसा नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या दोन दिवसापासून शहरांमध्ये सर्वत्र पाऊस असल्याने जागोजागी पाणी साचले आहे. पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष हे केवळ नावापुरतेच असून नगरपालिकेचे प्रशासन अशा आपत्तीच्या काळात ही झोपी गेलेले दिसत आहे. इंदीरा नगर औसा येथील कैकाडी वस्तीमध्ये पाणी घुसल्याने महिला बालकांना व घरातील मंडळींना रात्र जागून काढावी लागली व शिवाय रात्रभर साप विंचु हे निघत असल्याने दोन्ही बाजूने हैरानी परेशानी आहे, असे दृश्य आढळून आलेली आहे
याप्रकरणी औसा नगरपालिकेने तात्काळ कारवाई करून मोठी गटार नाली या ठिकाणी करून पाण्याची विल्हेवाट लावावी व घरात घुसणारे पाणी बंद करावे अशी मागणी या भागातील नागरिकांकडून होत आहे. यासाठी या परिसरातील नागरिकांकडून अनेकदा पालिकेस निवेदने ही दिली गेली होती,परंतु या बाबतीत नगरपालिकेकडुन दुर्लक्ष होत आहे.
0 टिप्पण्या