मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा पडण्यास कारणीभूत असणाऱ्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करा.
औसा प्रतिनिधी
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर 2023 साली उद्घाटन केलेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा केवळ सहा महिन्यात कोसळल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत छत्रपती शिवरायांनी समाजातील व सर्व जाती धर्मातील मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले. तसेच त्यांनी बांधलेले गळ किल्ले व पूल हे आज सुद्धा सुयोग स्थितीत आहे. परंतु आठ महिन्यापूर्वी उद्घाटन केलेल्या आमच्या राजांचा पुतळा भ्रष्ट शासन व गुत्तेदारांनी सदर पुतळा उभा करत असताना संगनमताने केलेल्या हल गर्जीपणामुळे सदरची घटना घडली आहे जी निंदणी आहे. तरी सदर निवेदनाद्वारे आपणास कळविण्यात येते की, आपण सलरील निवेदन आपल्या मार्फत शासन दरबारी कळवावे. पुतळा उभा करण्यास व पळण्यास कारणीभूत असणाऱ्या सर्व दोषीवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कार्यवाही करावी अन्यथा सामाजिक उद्रेक होऊन फार मोठे आंदोलन छेडण्यात येईल, यानंतर होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी ही शासनाची असेल याची नोंद घ्यावी अशी मागणी सकल मराठा समाज औसा तालुक्याच्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना 28 ऑगस्ट बुधवार रोजी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सकल मराठा समाजाचे प्रदीप मोरे. अँड शाम मोरे,पुरोषोत्म नलगे, नागेश मुंगळे, गोपाळ धानूरे, बालाजी साळुंके, सुर्यकांत शिंदे,बबलु पारी, ज्ञानेश्वर जाधव, ज्ञानेश्वर सुरवसे, अक्षय जाधव, जनार्दन तोरे, पांडुरंग माळी, विकास गवळी,धिरज थोरात,आकाश माने,भिमा इंगळे, नरसिंह येडोळे,आनंत भोसले, दिनकर चव्हाण, नामदेव जवळगे, आकाश गवळी, कैलास मुगळे, परमेश्वर सुरवसे,नरसींग माने, बाळासाहेब हासुरे, बाबासाहेब थोरात, विपूल पाटील, अक्षय नागरसोगे यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या