माझी लाडकी बहिण योजनेतील 15 जूलै ची तारीख रद्द करून सोप्या पद्धतीने कागद पत्राची अंमलबजावणी करा -लोकसत्ता युवा संघटनेची मागणी

 माझी लाडकी बहिण योजनेतील  15 जूलै ची तारीख रद्द  करून सोप्या पद्धतीने कागद पत्राची अंमलबजावणी करा -लोकसत्ता युवा संघटनेची मागणी 



औसा प्रतिनिधी 


लातूर 

 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी माझी लाडकी बहिण ही योजना आणला त्या योजनेचा उद्देश

 त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे


राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे.

 राज्यातील महिला स्वालंबी, आत्मनिर्भर करणे.

 राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालणा मिळणे.

 संरक्षण, भ्रष्टाचार निर्मुलन, योग्य सरकार

 महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थिीत सुधारणा व्हावे या हेतूने ही योजना अमलात आणली आहे, परंतु हया योजनेचे लाभ घेण्यासाठी जे कागदपत्रे सादर करणे आहे ते खूप जाचक व वेळ घालवू आहेत जसे की, महाराष्ट्र राज्याचे अधिकवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, तसेच सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटूंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला हे कागदपत्रे मिळविण्यासाठी कमीत कमी 15 दिवस लागतील आणि आपण योजनेच्या अंमलबजावणीसाठी काल मर्यादा केली ती अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात 1 जूलै 2024,  अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक 15 जुलै 2024 असा आहे आणि माझी लाडकी बहिण हिला हे कागदपत्र जमा करण्यासाठी किमान 15 दिवस लागतील आणि ती आपल्या माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहील. त्यामुळे मा. मुख्यमंत्री यांना विनंती आहे की, माझी लाडकी बहिण योजनेतील कागदपत्र अधिवास, जन्मदाखला, उत्पन्न दाखला कागदपत्राची मागणी रह करुन सोप्या पध्दतीने या योजनेची अंमलबजावणी करावी. जसे की माझी लाडकी बहिण योजना लाभ घेण्यासाठी, आधारकार्ड, राशनकार्ड, बैंक पासबुक घेऊन योजनेचा लाभ देण्यात यावा.

 राशनधान्य प्राप्त लाभार्थी 2.50 लाखा पेक्षा कमी उत्पन्न असल्या कारणाने त्यांना ए.पी.एल. पी.पी.एल., ए.ए.वाय इत्यादी राशनकार्ड देण्यात आले आहे त्यालाच उत्पन्नाचा दाखला आणि अधिवास प्रमाणपत्र गृहीत धरावे.अशी मागणी लोकसत्ता युवा संघटनेच्या वतीने लातूर जिल्हाधिकारी मार्फत महामाहीम मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी लोकसत्ता युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ईलाही बशीरसाब शेख,उमरभाई कलाल, इरफान कुरेशी, आसिफ निचलकर, अमीर पठाण,लतीफ शेख, फय्याज सय्यद यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या