महाविकास आघाडीचे ०६ जूलै 2024 रोजी औसा येथे रास्ता रोको आंदोलन.
औसा प्रतिनिधी
खरीप हंगाम २०२३-२४ पिकविमा सरसकट त्वरीत देण्यात यावी.
शेतकऱ्यांची सरसकट चालु व थकबाकी कर्ज माफी करण्यात यावी.
आचारसंहिते मध्ये पंतप्रधान आवास घरकुल योजनेतून आचारसंहितेचे उलंघन करून वाटप झालेले घरकुल रद्द करण्यात यावे.
औसा शहरातील मुख्य चौकातील उडाणपुल पिल्लरचा बांधण्यात यावा. औसा शहरातील बेघर घरकुल योजना रद्द झालेले प्रस्ताव फेरप्रस्ताव शासनाला पाठवण्यात यावे.
संगायो-इंगायो योजनेतील वंचित व बंद झालेल्या लाभार्थ्यांना त्वरीत योजनेचे लाभ देण्यात यावे.
पी एम किसान योजनेतील अनेक पात्र व वंचित लाभार्थ्यांना योजनेचे निधी देण्यात यावे. औसा तालुक्यातील अनेक गावात घरकुल योजनेपासुन वंचित ठेवण्यात आले असल्याने त्यांना त्वरीत, घरकुलाचा लाभ देण्यात यावा.या सर्व मागणीसाठी पूर्व कल्पना देऊन सुद्धा आमच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने 6 जुलै 2024 रोजी हाशमी चौक,टी पाॅईट औसा येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार दिनकर माने, कॉग्रेस कमिटीचे जिलाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे लातूर कार्याध्यक्ष रशीद शेख, यांच्या मार्गदर्शनाखाली औसा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.अशी माहिती
कॉग्रेस कमिटीचे जिलाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी महाविकास आघाडीच्या वतीने दिली आहे.
0 टिप्पण्या