आजच्या अर्थ संकल्पात शेतकरी, निराधार बांधव राम भरोश्यावर -राजेंद्र मोरे आणि राजीव कसबे

 आजच्या अर्थ संकल्पात शेतकरी, निराधार बांधव राम भरोश्यावर -राजेंद्र मोरे आणि राजीव कसबे



 

औसा प्रतिनिधी 


आजचा अर्थ संकल्प मांडताना सरकारकडून आम्ही जातो आमच्या गावा आमचा शेवटचा राम राम घ्यावा असे एकंदरीत शेतकऱ्यांसह राज्यातील जनतेला वाटत असल्याची प्रतिक्रिया शेतकरी चळवळीतील नेते राजेंद्र मोरे आणि राजीव कसबे यांनी दिली आहे 

एकूणच अर्थ संकल्पात कुठेही गतवर्षी पडलेल्या दुष्काळी परिस्थितीचा धागादोरा नाही, पीकविमा, नुकसान भरपाई याविषयीं चकार शब्द सुद्धा आढळून आलेला नाही , सरकारने घेतलेल्या चुकीच्या धोरणामुळे सोयाबीनचे भाव प्रचंड कोसळले. प्रति हेक्टर वीस क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झाल्यास 10 हजार भाव मिळाला तर 2लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते परंतु बाजारात 5 हजारापेक्षा खाली भाव आला अन हेक्टरी एक लाखाचे नुकसान सरकारने केले अन वरून 5 हजार रुपये सरकार कडून भीक देऊन आमची थट्टा केली जात आहे. बाजारच्या स्टॅन्ड वर शेतकऱ्याचा सरकार कडून एक लाखाचा खिसा कापला अन गावाकडे जायला तिकीट खर्च म्हणून त्यास खिसे कापूनेच 5 हजार रुपये दिले अशी म्हणायची पाळी या अर्थ संकल्पाकडे पाहताना आली आहे.निव्वळ निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मांडलेला हा अर्थसंकल्प असल्याची टीका राजेंद्र मोरे आणि राजीव कसबे यांनी केली आहे. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना 3000 रू प्रति महिना मानधन देण्याचे गाजर दाखवत आता सुद्धा अगोदरच सुरु असलेले दरमहा 1500 रू मानधन या ही अर्थ संकल्पात पुन्हा नव्याने मांडून गोरगरीब विधवा, परित्यकता, घटस्फोटीत महिला, दिव्यांग, दुर्धर आजार ग्रस्त व्यक्ती आणि वृद्ध निराधार महिला पुरुष लाभार्थी यांच्या तोंडाला पाने पुसली असून त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आलेले आहे.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने आज सर्व बी बियाणे, खत, कीटकनाशके यांच्या किंमतीत प्रचंड वाढ झालेली असताना शेतकऱ्याच्या जीवनात शास्वत विकास होण्यासाठी अजिबात उपाययोजना नसून उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाला भाव दिल्यास अशा भिकारचोट योजना शेतकरी स्वीकारणार सुद्धा नाही. त्याच्या घामाच्या धारावर संपूर्ण जगाला पोसण्याची ताकत बळीराजात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या