शांताबाई मल्लिनाथ महाराज यांच्या स्मरणार्थ मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

 शांताबाई मल्लिनाथ महाराज यांच्या स्मरणार्थ मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.





औसा प्रतिनिधी 


औसा येथील नाथ संस्थान च्या दिवंगत शांताबाई मल्लिनाथ महाराज यांच्या प्रथम स्मरणार्थ येथील श्री नाथ सभागृह औसा येथे शनिवार दिनांक 15 जून 2024 रोजी भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर व चष्म्याचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विवेकानंद हॉस्पिटल लातूर येथील प्रसिद्ध नेतृत्वज्ञांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नेत्र रुग्णांची मोफत तपासणी करून गरजूंना चष्म्याचे वाटप करण्यात आले तर ज्या नेत्र रुग्णांना डोळ्याच्या ऑपरेशनची आवश्यकता आहे अशांना लातूर येथे शस्त्रक्रियेसाठी बोलवण्यात आले आहे. श्रीक्षेत्र काशी येथील जंगमवाडी मठाचे श्रीमद जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी आणि औसा येथील हिरेमठ संस्थानचे पिठाधिपती बाल तपस्वी 108 श्री निरंजन शिवाचार्य महाराज यांनी शिबीर स्थळास भेट देऊन स्वर्गीय शांताबाई मल्लिनाथ महाराज यांच्या स्मरणार्थ आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराचे कौतुक करून आशीर्वाद दिले. नाथ सभागृहामध्ये सकाळी 10 ते  2 वाजेपर्यंत शहर व परिसरातील सुमारे 401 नेत्र रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. या शिबिरास शहरातील नेत्र रुग्णांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला. शिबिर संयोजक मच्छिंद्रनाथ मल्लिनाथ महाराज यांच्या वतीने शिबिरार्थींची उत्कृष्ट भोजन व्यवस्था करण्यात आली होती. याप्रसंगी नाथ संस्थांचे पाचवे पिठाधिपती सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर आणि पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर, नाथ संस्थानचे डॉक्टर विरनाथ महाराज औसेकर, रवींद्रनाथ महाराज औसेकर, श्रीरंग महाराज औसेकर, श्री अनिरुद्ध महाराज, ज्ञानराज महाराज, अधिराज महाराज यांच्यासह शिबिराचे सहसंयोजक सुरेशअप्पा ठेसे ,विजयकुमार बोरफळे, शिवशंकर पाटील, हनुमंत रामपुरे, रोहित हंचाटे, श्री नाथ सेवा मंडळाचे वैजनाथ अप्पा इळेकर, गुंडानाथ सूर्यवंशी, अमर मनगुळे ,पप्पू गवळी, महालिंग मंठाळे,प्रभुप्पा माशाळे, मनोहर कोरंगळेकर, रवी सरदेशमुख,बी एस कुलकर्णी, अजमोद्दीन शेख, धनु स्वामी, संभाजी शिंदे, नवनाथ औटी,नागराळे यांच्यासह अनेक मान्यवर शिबीर यशस्वीतेसाठी व नोंदणीसाठी प्रयत्नशील होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या