शांताबाई मल्लिनाथ महाराज यांच्या स्मरणार्थ नेत्र चिकित्सा शिबिर.
औसा प्रतिनिधी
नाथ संस्थानच्या दिवंगत शांताबाई मलीनाथ महाराज यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त गरजू नेत्र रुग्णासाठी शनिवार दिनांक 15 जून 2024 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेमध्ये श्री नाथ सभागृह महाराज गल्ली औसा येथे भव्य नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. मोतीबिंदू ,काचबिंदू, तिरळेपणा, मधुमेह इत्यादी अनेक कारणामुळे डोळ्याचे आजार निर्माण होऊन डोळ्यांना अपाय होतात त्यासाठी गरजू रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करून मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात येणार आहे तसेच शिबिरात येणाऱ्या शिबिरासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे तरी गरजूंनी या शिबिराचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक मच्छिंद्रनाथ मल्लिनाथ महाराज आणि सुरेश आप्पा ठेसे, बालाजी पाटील आणि विजयकुमार बोरफळे यांच्या वतीने करण्यात येते.
0 टिप्पण्या