कृषी सेवा केंद्रांने अनुदानित उपलब्ध बियाणांचे फलक लावावे -सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांची मागणी

 कृषी सेवा केंद्रांने अनुदानित उपलब्ध बियाणांचे फलक लावावे -सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांची मागणी  



औसा प्रतिनिधी 

औसा तालुक्यातील व शहरातील कृषी सेवा केंद्राने अनुदानीत उपलब्ध बियाणांचे फलक लावण्यात यावे याबाबत एम आय एम च्या वतीने खासदार व आमदार यांना एक एक पत्र माहितीस्तव औसा तहसीलदार व कृषी अधिकारी यांना पण निवेदन देण्यात आले.

 औसा शहरासह तालुक्यातील परवानाधारक कृषी सेवा केंद्रात रासायनिक खत व अनुदानीत बि-बियाणे विक्री सुरु आहे. तालुक्यात पेरणी योग्य पाऊस वेळेवर पडला असून बियाणे व खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडत आहे. याचा फायदा दुकानदार उचलत आहे. शेतकरी ग्राहकांना व्यवस्थित न बोलता उडवाउडवीची उत्तरे देत आहे. तर अनुदानीत बियाणांचे परमीट असून दुकानदार बियाणे देण्यास टाळाटाळ करीत आहे.


उपलब्ध खत व बियाणे व अनुदानित बि-बियाणांचा साठा फलकावर नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव चढ्या भावाने बि-बियाणे खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे शेतक-यांची आर्थिक लुट होत आहे. यास कृषी विभाग जबाबदार आहे. औसा तालुक्यातील कृषि केंद्रांनी दरपत्रक व स्टॉक फलक न लावणाऱ्या दुकानदाराचे परवाने कायम स्वरुपी बंद करावेत. कृषि विभागाने या निवेदनाची दखल तात्काळ घेऊन दरफलक व स्टॉक

फलक लावावेत अन्यथा एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी आंदोलन करण्यात येईल असा इशारा   निवेदनाद्वारे दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या