श्री नृसिंह जन्मोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.

 श्री नृसिंह जन्मोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.



औसा प्रतिनिधी 


औसाः औसा येथील माळी गल्ली आणि केसरिया चौक येथील नृसिंह भक्ताच्या पुढाकारातून श्री नृसिंह जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दि. १३ ते २१ मे २०२४ या कालावधीमध्ये नित्य महाअभिषेक व महाआरती तसेच ज्ञानवर्धिनी महिला भजनी मंडळ, हिरेमठ महिला भजनी मंडळ, अहिल्यादेवी महिला भजनी मंडळ, संत तुकाराम महिला भजनी मंडळ, श्रीराम महिला भजनी मंडळ, मन्मथ स्वामी महिला भजनी मंडळ व श्रीनृसिंह महिला भजनी मंडळ, औसा


यांचे भजन गायनाच्या कार्यक्रम संपन्न झाला. तसेच दि. २१ मे २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजून ४७ मिनिट या शुभमुहूर्तावर श्री नृसिंह जन्मोत्सवा निमित्त गुलाल उधळण्याचा कार्यक्रम होणार असून नृसिंह जन्मोत्सवा नंतर भाविक भक्तासाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माळी गल्ली व केसरीया चौक केसरीया मित्र मंडळ, औसा येथील नरसिंह भक्त यांच्या वतीने करण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या