विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये नृसींह क्लब ने प्रथम क्रमांक पटकावला.

 विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये नृसींह क्लब ने प्रथम क्रमांक पटकावला.




कॉग्रेसचे जिलाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण .


औसा/प्रतिनिधी एम बी मणियार 

औसा.

लातूर जिल्ह्याचे स्वर्गीय लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेचे तालुका स्तरीय आयोजन स्पर्धेचे संयोजक प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शना खाली औसा येथील उटगे मैदानावर करण्यात आले होते. काँग्रेसचे लातूर जिल्हा अध्यक्ष श्रीशैल उटगे यांच्या हस्ते स्पर्धे चे उद्घाटन करण्यात आले होते. दिनांक २२ मे २०१९ रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना नृसिंह क्लब तपसे चिंचोली आणि एस एच स्पोर्ट्स क्लब औसा


यांच्यामध्ये झाला. विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये तपसे चिंचोली येथील नृसिंह क्लब या टीमने ५१ हजार रुपयाचे प्रथम पारितोषिक व चषक जिंकून प्रथम क्रमांक पटकावला, उपविजेता म्हणून


एस एच स्पोर्ट्स क्लब औसा या संधाने ३१ हजार रुपये रोख व चषक जिंकून द्वितीय क्रमांक मिळविला.


तालुक्यातील अनेक क्रिकेट संघाने या तालुकास्तरीय क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये


सहभाग नोंदविला होता. अत्यंत उत्स्फूर्तपणे या स्पर्धाचे उटगे मैदान येथे भव्य आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांच्या हस्ते विजेत्या संघाला पारितोषिक देऊन सन्मानित


करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे औसा तालुका कार्याध्यक्ष प्रशांत भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सनाउल्ला शेख, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजय सगरे, ज्ञानोबा जोगदंड, समीयोद्दीन पटेल, मुकेश बिदादा, किशोर टोम्पे, राजू कसबे, विवेक मिश्रा, मनोज शिंदे, इलियास चौधरी, आदिनाथ धानुरे, नियामत लोहारे, सरफराज पटेल, खाजाभाई शेख, अरबाज शेख यांच्यासह अनेक मान्यवर व क्रिकेट प्रेमी नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या