औसा तालुक्यात " गाळ मुक्त धरण, गाव युक्त शिवार" योजना प्रभावीपणे राबवा - लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे ..

 औसा तालुक्यात " गाळ मुक्त धरण, गाव युक्त शिवार" योजना प्रभावीपणे राबवा - 

लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे ..





औसा प्रतिनिधी : -

 औसा तालुक्यात " गाळ मुक्त धरण, गाव युक्त शिवार" योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी  लातूर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितत औसा तालुक्यातील मौजे मातोळा, लोहटा, माकणी, आशिव गावाची पाहणी करण्यात आली असून यावेळी लातूरचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर -घुगे मॅडम यांच्यासह उपविभागीय अधिकारी औसा - रेणापूरचे अविनाश कोरडे, औशाचे तहसीलदार भरत सुर्यवंशी, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता अमर पाटील, जिल्ह्याचे जलसंधारण अधिकारी अ शि. कांबळे उपस्थित होते. या विषयी वृत्त की,

दि. ०३ एप्रिल २०२४ बुधवार रोजी सायंकाळी ०४ : ०० वाजता अचानक प्रकल्पाच्या क्षेत्रीय कामाची पाहणी करण्यात आली. या सोबत लातूर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत्र, पाणी टंचाई परिस्थिती बाबत तपासणी, आरक्षित पाणीसाठा प्रतिबंधात्मक उपाययोजना, सद्यस्थितीतील पाणीसाठा उपलब्धता, त्यावर अवलंबून गाव, तालुके, तांडा वस्ती इत्यादी बाबत सखोल विचारणा करण्यात आली. औसा तालुक्यातील विविध गावांमध्ये 'गाळ मुक्त धरण, गाव युक्त शिवार'  योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सुचना व मार्गदर्शन करण्यात आले, औसा तालुक्यात सध्याच्या पस्थितीतील पाणी टंचाई व उपाय योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच पाण्याचा जलस्रोत वाढविण्यासाठी, पाणी साठा वाढविणे व जमीन सुपीक होणे व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे यावर उपाय योजना म्हणून लातूर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितत औसा तालुक्यातील विविध गावांमध्ये भेटी दिल्या. यावेळी क्षेत्रिय सर्व अभियंता व कर्मचारी यांचा सोबत काम करत महसूल, गाव पातळी वरील सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांचा सहभाग बाबतीत प्रकल्पा स्थळी सूचना व आदेश दिले, सोबत सेवाभावी संस्थांच्या कामाची पाहणी केली आणि सर्व ग्रामस्थ, शेतकरी, लाभधारक यांच्या सोबत संवाद साधत सहभाग नोंदविण्याबाबत चर्चा करून 'गाळ मुक्त धरण, गाळ युक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या, यावेळी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता अमर पाटील, जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी अभियंता नितीन बी. पाटील यांच्या सह सर्व क्षेत्रीय अभियंते, महसूल गाव पातळीवरील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या