संत गोरोबाकाका यांच्या दर्शनाला औसा येथून पायी दिंडी रवाना.

 संत गोरोबाकाका यांच्या दर्शनाला औसा येथून पायी दिंडी रवाना.


 औसा प्रतिनिधी 

श्री संत गोरोबाकाका यांच्या दर्शनाला औसा येथून श्रीक्षेत्र तेर येथे पायी दिंडीची प्रथा दिंडी चालक तथा अखिल भारतीय वारकरी मंडळाचे औसा तालुका संघटक गोरोबा तुळशीराम पुरे यांनी सुरू केले असून पायी दिंडीचे हे अखंड 25 वे वर्ष आहे. बुधवार दिनांक 3 एप्रिल रोजी दुपारी 2  वाजता औसा शहरातील मुख्य रस्त्यावरून विठ्ठल नामाचा गजर करीत हातात भगव्या पताका घेऊन टाळ मृदंगाच्या निनादात वारकरी महिला व तरुण वर्ग या दिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. या दिंडीचा पहिला मुक्काम ब्राहणपूर येथे होणार असून भादा ,वडजी, भेटा ,कोंड, जागजी मार्गे ही पायी दिंडी एकादशी दिवशी श्रीक्षेत्र तेर येथे श्री संत गोरोबाकाका यांच्या दरबारी जाते. विठ्ठल नामाचा गजर व भजन करीत वारकरी दरवर्षी मोठ्या संख्येने या दिंडीमध्ये पायी जातात या दिंडी कालावधीमध्ये हभप बालाजी महाराज वांजरखेडा, संतोष वगैरे महाराज, बापू खेरडे कर महाराज, खंडू लटुरे महाराज, दिनकर निकम महाराज, आणि मोहन भोंग महाराज जायफळकर यांचे कीर्तन होणार असून वैजनाथ महाराज पांचाळ यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी श्री संत गोरोबाकाका पादुका मंदिर समदर्गाचा औसा येथे ह भ प नवनाथ महाराज चिखलीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने पायी दिंडीची सांगता होणार आहे अशी माहिती श्री गोरोबा कुरे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या