अखेर धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर पडदा पडला महायुती तर्फे अर्चनाताई पाटील मैदानात.

 अखेर धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर पडदा पडला महायुती तर्फे अर्चनाताई पाटील मैदानात.



 औसा प्रतिनिधी


 विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने पुनश्चिम उमेदवारी दिली होती शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली असताना महायुतीमध्ये मात्र मोठ्या संभ्रम निर्माण झाला होता धाराशिव मतदार संघाची जागा भारतीय जनता पार्टीने लढवावी की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने लढवावी अथवा अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने लढवावी याबाबत अनेक दिवसापासून खलबत्ते सुरू होती भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाचा उमेदवार देण्याबाबत समन्वय होत नव्हता वरिष्ठ नेत्यांनी अनेक दिवस या मतदारसंघाबद्दल चर्चा करून धाराशिव लोकसभा मतदारसंघ महायुतीकडे खेचून आणण्यासाठी विवरचना तयार करण्यासाठी बराच कालावधी घातला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी बाबत बैठका व बैठका घेत तिन्ही पक्षाच्या उमेदवारांची चाचपणी केली. भाजप तर्फे सनदी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी यांना सनदी अधिकारी पदाचा राजीनामा देण्यास सांगून धाराशिव मतदार संघात लोकसभेच्या मैदानात उतरविण्याची तयारी सुरू केली होती. तसेच श्री यश प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे यांनाही देवेंद्र फडणवीस यांनी कामाला लागण्याचे संकेत दिले असल्याची चर्चा मतदारसंघांमध्ये सहा महिन्यापासून सुरू होती चाळीस वर्षे काँग्रेस पक्षाची निष्ठेने सेवा केलेले माजी मंत्री बस्वराज पाटील काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्याही नावाची संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा सुरू झाली. धाराशिव जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष शिवाजीराव चालुक्य यांच्याही नावाची चर्चा सुरू होती तर एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेतून माजी खासदार रवींद्र गायकवाड, विद्यमान आरोग्य मंत्री तानाजी सावंत, यांचे पुतणे धनंजय सावंत त्यांच्या नावाची चर्चा मतदारसंघांमध्ये रंगत होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातर्फे भाऊसाहेब बिराजदार, साखर कारखान्याचे चेअरमन सुरेश दाजी बिराजदार यांनीही संपर्क सुरू ठेवला होता उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी राणा जगजीत सिंह पाटील यांना घड्याळ चिन्हावर राष्ट्रवादीतर्फे ही निवडणूक लढविण्यास विनंती केली होती परंतु धाराशिव मतदार संघाची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी इलेक्टीव्ह मेरिट बेसिसवर मोठ्या प्रमाणामध्ये खलबत्ते सुरू झाली आणि अखेर तुळजापूरचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या पत्नी आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष सौ अर्चना ताई पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश देऊन गुरुवार दिनांक 4 एप्रिल रोजी धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात टाकण्यात आली. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना अर्चनाताई पाटील यांनी महिला सक्षमीकरणासोबतच महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच महिला बचत गटाच्या मेळाव्याच्या माध्यमातून तसेच महिलांचे मोठ्या प्रमाणामध्ये संघटन उभारून सामाजिक क्षेत्रासह मुख्याने महिला वर्गाच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी आर्थिक परिश्रम घेतले होते त्यांचा वाढता लोकसंपर्क आणि राजकारणातील शांत संयमी व सर्वांचे प्रश्न जाणून घेऊन प्रश्नाचे सोडवणूक करण्याचा स्वभाव या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून महायुतीच्या वतीने त्यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी बहाल करण्यात आली. विद्यमान शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महायुतीच्या उमेदवार सौ अर्चनाताई पाटील यांच्यामध्ये आता सरळ लढत होणार असून कोण बाजी मारणार याकडे मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागलेले आहे. महायुतीच्या उमेदवार सौ. अर्चनाताई पाटील यांच्या विजयासाठी औसा विधानसभा मतदारसंघातून आमदार अभिमन्यू पवार, उमरगा विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार रवींद्र गायकवाड, विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले, भाजपचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव चालुक्य, तुळजापूर मतदारसंघाचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील, विधान परिषदेचे सदस्य सुरजीत सिंह ठाकुर आणि विद्यमान आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत व बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. महायुतीने समन्वयाने प्रचार यंत्रणा राबविल्यास अर्चनाताई पाटील ह्या या मतदारसंघांमध्ये चमत्कार घडवून परिवर्तन करतील असा विश्वास या मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांना आहे तर विद्यमान खासदार उमराजे निंबाळकर यांच्या विजयासाठी औसा विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार दिनकरराव माने, महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाचे उपाध्यक्ष संतोष सोमवंशी, महिला आघाडीच्या जयश्रीताई उटगे, शिवसेनेचे लातूर जिल्हा उपप्रमुख बजरंग दादा जाधव, धाराशिव चे आमदार कैलास पाटील यांच्यावर विद्यमान खासदाराच्या प्रचार यंत्रणेची मदत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या