लक्षात ठेवा भाजपला मत म्हणजे महागाईला, बेरोजगारीला मत- महाविकास आघाडी
औसा प्रतिनिधी.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे
महाविकास आघाडी चे उमेदवार खा. ओमराजे निंबाळकर यांना औसा शहरातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निवडून आणण्यासाठी एक जूटीने प्रचाराच्या कामाला जोमाने सुरुवात केली आहे.आपला बुथ आपली जबाबदारी या निमित्ताने औसा शहरातील प्रभाग क्रमांक 9,10 व 3, 4 मधील कटगर गल्ली, खंदक गल्ली,जमाल नगर, पवार नगर,शफा नगर या भागात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खा. ओमराजे निंबाळकर यांची प्रचार फेरी काढून उमेदवाराचे मशाल चिन्हाचे माहितीपत्रक डोर -टु -डोर वाटप करुन मतदारांना येत्या 7 मे ला मशाल चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत. व तसेच उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार खा. ओमराजे निंबाळकर यांना निवडून आणण्या करीता सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कंबर कसली असून मतदारसंघात डोर -टु -डोर जाऊन महाविकास आघाडीचे पदधिकारी कार्यकर्ते माहितीपत्रक वाटप करून मतदारांना भेटून येत्या 7 मे ला मशाल चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे असे प्रचार एक जुटी ने करताना दिसत आहेत. औसा शहरातील दक्षिण, उत्तर भागात प्रचारा ची एक फेरी पूर्ण केली असून मतदारही त्यांना चांगल्याप्रकारे साथ देत आहे.
यावेळी या प्रचार फेरीत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सांगत होते.माता भगिनींना घातक अशा चुलीवर स्वयंपाक करावा लागू नये म्हणून मोदी सरकारने गाजावाजा करत उज्वला गॅस आणली,पण या योजनेचा फज्जा उडाला.वाढत्या गॅस सिलिंडर दरामुळे आणि तुटपुंज्या सबसिडी मुळे माता भगिनींना पुन्हा चुलीचाच आधार घ्यावा लागत आहे. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचे तर सर्वसामान्य जनतेचे आर्थिक कंबरडे मोडून टाकले.गेल्या 10 वर्षात मोदी सरकारने दिली ती फक्त महागाईची,बेरोजगारीची गॅरंटी.त्यामुळे लक्षात ठेवा भाजपला मत म्हणजे महागाईला, बेरोजगारीला मत.असे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते प्रचार फेरीत मतदारसंघात प्रचार करीत होते.यावेळी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार खा ओमराजे निंबाळकर यांनी प्रचंड मतांनी निवडून येतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी प्रचार फेरीत कॉग्रेसचे शहराध्यक्ष शकील शेख, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष शेख रशीद सर, अँडव्होकेट ,समीयोद्दीन पटेल, अँडव्होकेट शाहनवाज पटेल, अँडव्होकेट मजहर शेख, अँडव्होकेट फैय्याज पटेल,मारुफ शेख, खुंदमीर मुल्ला, मौलाना कलीमुल्ला,शेख सनाऊल्ला,आदमखां पठाण, वसीम खोजन,सुरेश भुरे, अनीस जहागीरदार, इंजिनिअर अजहर हाशमी,जयराज कसबे, इस्माईल शेख,नियामत लोहारे, मुजीब शेख,पाशाभाई शेख,मुनीर खोजन,खाजाभाई शेख ,खादर सय्यद, शब्बीर भाई शेख, सईद सावकार, हाजी सय्यद हमीद, नय्युम कुरेशी, व्यंकट नाना माने,खाजाभाई कुरेशी,सुनील भुरे,जाधव आदि महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या