महायुतीच्या अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ औसा शहरातून भव्य पदयात्रा
औसा प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय समाज पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आरपीआय आठवले गट या महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई राणा जगजीत सिंह पाटील यांच्या प्रचारार्थ औसा शहरात लातूरवेस हनुमान मंदिर येथे श्रीफळ फोडून पदयात्रेचा शुभारंभ गुरुवार दिनांक 25 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता करण्यात आला. आपकी बार मोदी सरकार च्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी लातूर वेस हनुमान मंदिरापासून कुंभार गल्ली, धनगर गल्ली, पाटील गल्ली, ब्राह्मण गल्ली, न्हावी गल्ली, सुतार गल्ली, माळी गल्ली, कलमे गल्ली, नाईकवाडे गल्ली, भुसार वेस, आझाद गल्ली, महाराज गल्ली या मार्गावरून भव्य पदयात्रा करून महायुतीचे घड्याळ चिन्ह असलेले परिपत्रक घरोघरी देऊन नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी मतदारांनी साथ द्यावी असे आवाहन करण्यात आले. पदयात्रेमध्ये शेकडो कार्यकर्ते आणि महिला उस्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या माजी नगराध्यक्ष किरण राजशेखर उटगे यांच्या शिस्तबद्ध नियोजना खाली या पदयात्रेमध्ये भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते सुशीलकुमार बाजपाई, ॲड अरविंद कुलकर्णी, मुक्तेश्वर वागदरे, माधव सिंह परिहार, राम कांबळे, वीरभद्र कोपरे, गोपाळ धानुरे, व्यंकटेश कोदरे, मुकेश पवार, संगमेश्वर उटगे, लिंबराज जाधव, प्रणव नागराळे, सागर पुणे, महिला आघाडीच्या जिल्हा सचिव कल्पनाताई डांगे, सुवर्णा नाईक यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते तरुण वर्ग आणि महिला उपस्थित होत्या.
0 टिप्पण्या