विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मूर्तीची स्थापना शहरातून भव्य मिरवणूक
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील पवार नगर येथे भावी भक्ताच्या प्रयत्नातून विठ्ठल रुक्मिणी मंदिराची उभारणी करण्यात आली असून या मंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी मूर्तीची स्थापना शहरात आगमन झाल्यानंतर लातूर वेस हनुमान मंदिरापासून पवार नगर पर्यंत ज्ञानोबा तुकाराम चा गजर करूच टाळ मृदंगाच्या गजरात वारकरी दिंडी व भजनी मंडळाच्या महिलांनी सहभाग घेत शेकडो महिलांनी डोक्यावर अमृत कलश घेऊन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मूर्तीची शोभायात्रा काढल्यानंतर दिलीप नरसिंगराव पवार, विजयकुमार मिटकरी, व्यंकट जाधव यांनी ही मिरवणूक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. मंदिराजवळ मूर्ती वंचित पूजा करून जलाधिवास धान्य दिवस इत्यादी धार्मिक उपक्रम झाल्यानंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याचे परिसरातील भाविक भक्तांनी सांगितले.
0 टिप्पण्या