आरक्षणाची वाट न पाहता महिलांचा सन्मान करणारे नरेंद्र मोदी- डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर
औसा प्रतिनिधी
देशाचे कर्तबगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच क्षेत्रातील चौफेर विकासाच्या माध्यमातून देशाचा नावलौकिक जगात वाढविला आहे स्थानिक स्वराज्य संस्था प्रमाणे विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याचा महत्त्वकांक्षी निर्णय घेतला असून महिलांच्या 33% आरक्षणाची अंमलबजावणी होण्याची वाट न पाहता महिलांचा सन्मान करणारे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करावा लागेल असे प्रतिपादन अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी केले. दिनांक 12 एप्रिल रोजी औसा येथील विजय मंगल कार्यालय येथे आयोजित भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा व सत्कार कार्यक्रमाला प्रसंगी त्या बोलत होत्या. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर डॉ अर्चनाताई पाटील यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आमदार राणा जगजितसिंह पाटील आमदार अभिमन्यू पवार भाजपचे लातूर जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता माजी नगराध्यक्ष किरण राजशेखर उटगे ,तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, शहराध्यक्ष सुनील उटगे, कासार शिरसी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे, उपसभापती भीमाशंकर राजट्टे,माजी नगराध्यक्ष संगमेश्वर ठेसे, अँड.मुक्तेश्वर वागदरे,सरचिटणीस शिवकुमार मुर्गे,भाजपा उपशहराध्यक्ष भिमाशंकर मिटकरी,विकास कटके, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष अक्रमखान पठाण,मिनहाज पटेल,पप्पुभाई शेख,आदिल शेख,महिला आघाडीच्या कल्पना डांगे, ऍड परीक्षित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर म्हणाल्या की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा विधानसभा मतदारसंघांमध्ये हजारो कोटी रुपयांचा विकास निधी दिल्यामुळे औसा विधानसभा मतदारसंघाच्या चेहरा मोहरा बदलण्याचे कार्य होत असून मतदारसंघाच्या विकासामुळे तालुक्याचा कायापालट होण्यास मोठी मदत होत आहे असेही त्यांनी सत्काराला उत्तर देताना स्पष्ट केले.
विकरमी मताधिक्यासाठी माजी व कार्यकर्त्यांची कसोटी पणाला - आ.पवार
धाराशिव लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या वतीने सौ अर्चनाताई राणा जगजीत सिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करून 400 पेक्षा अधिक जागा लोकसभेमध्ये जिंकून देशहिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाण्यासाठी औसा विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्य मिळवून देण्यासाठी माझ्यासह मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून ही आपल्या कसोटीची वेळ आहे आदित्य मिळवून घेण्यासाठी प्रत्येक बूथ वरील कार्यकर्त्यांची कसोटी हीच भविष्यातील त्यांच्या राजकीय वाटचालीची नांदी आहे असे सांगून आमदार अभिमन्यू पवार यांनी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून मागील नऊ वर्षांमध्ये विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाचा आढावा घेऊन औसा विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्य मिळवून द्यावे असे आवाहन केले.
भरघोस विकास निधी आणि शेत रस्त्यामुळे औसा पॅटर्न झाला-आमदार राणा पाटील
औसा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक निधी खेचून आणणारे आमदार म्हणून अभिमन्यू पवार यांचा उल्लेख करून महाराष्ट्र राज्याला शेत रस्त्याचा पॅटर्न तयार करून दिशा देण्याचे कार्य करणारे कार्यसम्राट व विकासाभिमुख प्रतिनिधी लाभल्याने मतदार संघाचा झपाट्याने विकास होत आहे असे आमदार राणा पाटील यांनी व्यक्त केले.
औशाच्या आमदारांना मंत्रीपदाची संधी -पाशा पटेल
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा शहरांमध्ये सुमारे 400 कोटी रुपयांचा निधी खेचून आणला तर औसा विधानसभा मतदारसंघांमध्ये तेराशे किलोमीटरचे क्षेत्रफळ तयार करून महाराष्ट्राला शेत रस्त्याचा पॅटर्न दाखवून दिला हजारो कोटी रुपयांचा विकास निधी खेचून आणणारे एकमेव आमदार म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली असून औसा विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला येणाऱ्या काळात जालना मिळावी म्हणून लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर होणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये आमदार अभिमन्यू पवार यांना मंत्रीपदाची निश्चित संधी लाभणार आहे अशी प्रतिक्रिया राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष शेतकरी नेते पाशा पटेल यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई राणा जगजीत सिंह पाटील यांना भरघोस मताधिक्य मिळवून देणारा मतदारसंघ म्हणून औसा मतदार संघाची नोंद होईल असा विश्वास पाशा पटेल यांनी यावेळी बोलून दाखविला प्रारंभी भारतीय जनता पार्टीचे औसा विधानसभा प्रमुख संतोष मुक्ता यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक चाबुकस्वार यांनी केले विजय मंगल कार्यालय औसा येथे आयोजित कार्यक्रमासाठी मतदारसंघातील हजारो महिला पुरुष तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या