औसा येथे महात्मा फुले यांना अभिवादन.
औसा प्रतिनिधी
सत्यशोधक समाजाचे आद्य प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त माळी गल्ली औसा येथे जयंती समितीच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाषआप्पा मुक्ता, श्री धनवंत कुमार माळी, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष सतीश नाईक, निवृत्ती कटके, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक उद्धव लोंढे, माळी समाजाचे अध्यक्ष सचिन माळी, चांगदेव माळी, संतोष सिंह वर्मा, जयराज ठाकूर, लिंबराज जाधव, कमलाकर फुटाणे सर युवराज चव्हाण, हनुमंत कांबळे, कमलाकर गोसावी, मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप मोरे, आनंद बनसोडे, महेश कांबळे, नारायणराव माळी, खंडू माळी, प्रकाश फुटाणे, प्रसाद फुटाणे, आकाश माळी, जगन्नाथ माळी, विठ्ठल माळी,पियुष म्हेत्रे, मुन्ना माळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महात्मा फुले जयंती समितीच्या वतीने औसा येथील मुख्य रस्त्यावर पाणपोई सुरू करण्यात आली असून शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले तसेच जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून विविध उपक्रमाने कार्यक्रम साजरा करण्यात आला. सायंकाळी सहा वाजता औसा शहरातील मुख्य रस्त्यावरून महात्मा फुले यांच्या जयंतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये शेकडो नागरिक तरुण कार्यकर्ते सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या